Uddhav Thackeray | शिवसेना बावनकशी सोनं जळतं तेव्हा उजळून निघते, बाकीच्यांचे पितळ उघडं पडणार, उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर हल्लाबोल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – आपली शिवसेना (Shivsena) खरी आहे, सोनं जळतं त्यावेळी उजळून निघते, बाकीच्यांचं पितळ उघडं पडेल तो भाग वेगळा, असे वक्तव्य आज उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केले. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) मातोश्रीवर आलेल्या ठाण्यातील महिला शिवसैनिकांशी बोलत होते. यावेळी ठाण्याचे खासदार राजन विचारे (MP Rajan Vikhare), रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray), उपनेत्या अनिता बिर्जे (Anita Birje) उपस्थित होत्या. यावेळी महिला शिवसैनिकांनी आरपारच्या लढाईला तयार असल्याचा विश्वास दिला.

 

ठाण्यातील महिला शिवसैनिकांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले, सोनं जळत त्यावेळी उजळून निघते. आपली शिवसेना बावनकशी सोनं आहे. त्यांचे पितळ उघडे पडणार. आता जी शिवसेना आहे ती खरी आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे पहिले आमदार वामनराव महाडिक (MLA Vamanrao Mahadik) यांची आठवण सांगितली. वामनराव महाडिक किती लढवय्या होते ते उपस्थितांना सांगितले.

 

शिवसेनेची महाप्रबोधन यात्रा 9 ऑक्टोबरला ठाण्यापासून सुरु झाली असून तिचा समारोप कोल्हापूरच्या बिंदू चौकात होणार आहे.
ठाण्यातील महाप्रबोधन यात्रेच्या उद्घाटन सभा खासदार राजन विचारे, जिल्हाध्यक्ष केदार दिघे (Kedar Dighe) आणि उपनेत्या अनिता बिर्जे यांनी यशस्वी केली.

 

भास्कर जाधव (Bhaskar Jadhav), विनायक राऊत (Vinayak Raut), राजन विचारे,
सुषमा अंधारे (Sushma Andhare), अनिता बिर्जे यांनी महाप्रबोधन यात्रेत केलेल्या तडाखेबंद भाषणाने ही सभा राज्यभरात गाजली.
अनिता बिर्जे यांच्या भाषणाची देखील सर्वत्र चर्चा झाली. आज त्या ठाण्यातील शिवेसनेच्या महिला आघाडीच्या शिवसैनिक,
पदाधिकारी यांच्यासह मातोश्रीवर आल्या होत्या.

 

Web Title :- Uddhav Thackeray | uddhav thackeray said shivsena is pure gold if burns it will shine again

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Uddhav Thackeray | तुम्ही म्हणत होता ना सरकार पाडून दाखवा, आम्ही पाडले; आता बडबड बंद करा, नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंना टोला

Andheri by-Election | ऋतुजा लटके यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरला तर? ठाकरेंचा प्लॅन बी

Shinde-Fadnavis Government | शिंदे-फडणवीस सरकारने आता आपले खरे रंग दाखवायला रुवात केली, राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप