Uddhav Thackeray | ‘राज्यात मध्यावधी निवडणूक लागणार’, उद्धव ठाकरेंचे कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्रामध्ये शिंदे सरकारला (Shinde Government) तीन महिने पूर्ण झाले आहेत. तर दुसरीकडे विरोधकांच्या गोटात हालचालींना वेग आला आहे. राज्यात लवकरच मध्यावधी निवडणुका (Mid-Term Elections) लागणार असून कामाला लागा, असे आदेश शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे- Uddhav Balasaheb Thackeray) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी कार्यकर्त्यांना दिले आहेत. उद्धव ठाकरे यांनी आज विधानसभा संपर्कप्रमुखांची बैठक बोलावली होती. या बैठकीदरम्यान उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना मोठा दावा केला आहे.

राज्यामध्ये राजकीय परिस्थिती अस्थिर झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी मोठ मोठ्या घोषणा करायला सुरुवात केली आहे. राज्यात कधीही मध्यावधी निवडणुका लागतील. आपल्याला प्रत्येकाच्या घराघरात पोहोचले पाहिजे. आपला मुख्यमंत्री असताना केलेले काम घराघरात पोहचवा. राज्यात मध्यावधी निवडणुका लागतील, त्याला तयार रहा, अशी सूचना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी विधानसभा संपर्क प्रमुख यांना दिल्या आहेत. केंद्र सरकारने (Central Government) महाराष्ट्रासाठी नवीन घोषणा केल्या आहेत. त्यामुळे राज्यात मध्यावधी निवडणुका लागू शकतात, असे मनिषा कायंदे (Manisha Kayande) यांनी म्हटले.

दरम्यान, शिर्डीमध्ये मंथन शिबिरामध्ये बोलत असताना राष्ट्रवादीचे (NCP) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील
(Jayant Patil) यांनीही मोठा दावा केला आहे. शिर्डीत राष्ट्रवादीचे शिबीर झाल्यानंतर राज्यातील सरकार पडेल,
असा दावा पाटील यांनी केला. तसेच सत्ता गेलीय म्हणून चिंता करु नका. आपल्याला गर्दीची हाव नाही.
आगामी काळात आपण महाराष्ट्रातले चित्र पलटून टाकू. आम्ही आघाडी करणार आहोत.
जर 114 जागा लढवल्या तर किमान 100 निवडून आणायच्या आहेत, असं म्हणत पाटील यांनी आघाडीचे संकेत दिले.

Web Title :- Uddhav Thackeray | uddhav thackeray says ready for mid term election in maharashtra news

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Calum MacLeod | कॅलम मॅक्लिओडची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

Priyanka Chopra | ‘मिस वर्ल्ड 2000’ची स्पर्धा होती ‘फिक्स’? प्रियांका चोप्राच्या विजयावर अनेक प्रश्न उपस्थित

Rajkummar Rao | अभिनेता राजकुमार राव याने मनातील ‘ते’ दु:ख अखेर बोलून दाखवले; म्हणाला कि….