Uddhav Thackeray | एअरबस प्रकल्प घालवल्यामुळे उद्धव ठाकरेंनी जनतेची माफी मागावी – भाजप

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे मुख्यमंत्री पदावर विराजमान झाल्यापासून गेल्या चार महिन्यात चार प्रकल्प राज्याच्या बाहेर गेले. आणि योगायोग म्हणजे हे सर्व प्रकल्प गुजरातला गेले. भाजपने यावर आता भाष्य केले आहे. उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) स्वत: ला घरात कोंडून घेतल्यामुळे हे प्रकल्प गुजरातला गेले आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) राज्यातील जनतेची माफी मागावी, अशी मागणी भाजपने (BJP) केली आहे.

 

भाजपने यासंबंधी आपल्या अधिकृत ट्वीटर अकाऊंटवरुन ट्वीट केले आहे. त्यात ते म्हणतात, सप्टेंबर 2019 मध्ये बंगळूरु, हैद्राबाद, उत्तर प्रदेश आणि गुजरात येथील प्रस्ताव तपासून ढोलेरा येथे प्रकल्प टाकण्याचा निर्णय घेतला गेला होता. या काळात महाराष्ट्र शासनाने (Maharashtra Government) कोणताही प्रस्ताव टाकल्याची किंवा चर्चा केल्याची नोंद आढळत नाही. फेब्रुवारी 2022 मध्ये देखील प्रकल्पाचे पुन्हा एकदा विश्लेशन करण्यात आले. यावेळी देखील महाराष्ट्रातून कोणीही चर्चेला गेलेले नाही. सप्टेंबर 2022 मध्ये एअरबसच्या (Tata Airbus) प्रकल्पासाठी (6 प्रस्तावित प्रकल्प आहेत) या प्रकल्पात महाराष्ट्र सरकार उत्सुक असल्याचे उद्योग मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना (Narendra Modi) कळविल्याची नोंद आहे.

तसेच कंपनीसोबत चर्चा न करता, प्रकल्प महाराष्ट्रात कसा काय येऊ शकतो, याचे महाविकास आघाडीने मार्गदर्शन करावे.
तब्बल अडीच वर्ष एकही प्रकल्प महाराष्ट्रात का आला नाही? याचा अभ्यास जयंत पाटील (Jayant Patil),
आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) आणि अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी केला आहे का?
कोणताही उद्योग राज्यात स्वतः हुन येत नाही, उद्योग धंद्याना वातावरण पोषक हवे.
खंडणी उकळून, उद्योगपतींच्या घरासमोर स्फोटके ठेवून, राज्यातील उद्योग धंदे बंद उद्धव ठाकरेनी (Uddhav Thackeray) करायला लावले होते.
त्याला साथ राज्याचे तत्कालिन गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी दिली होती. त्यामुळे आता उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राची माफी मागावी, असे भाजपने म्हंटले आहे.

 

Web Title :- Uddhav Thackeray | uddhav thackeray should apologize to the public bjps demand on tata airbus project

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Gujarat Election 2022 | निवडणूक आयोगाचा निर्णय ! गुजरातमध्ये विधानसभेपूर्वी 900 अधिकार्‍यांच्या बदल्या, जाणून घ्या कारण

Narayan Rane | ‘पंचवीस पैशांच्या नाण्यावर नारायण राणेंचा फोटो लावला’ – फेसबूक बहाद्दर

Tata Airbus Project | काँग्रेसचा घणाघाती आरोप, शिंदे फडणवीस सरकार गुजरातचे एजंट! प्रकल्पांपाठोपाठ मुंबई सुद्धा त्यांना देऊन टाकतील