Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंची मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर जहरी टीका, ”असा माणूस राज्याचा कारभार करायला नालायक”

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – Uddhav Thackeray | राज्यात पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्याचे आदेश जिल्हास्तरावर देण्यात आले. परंतु, दुष्काळी भागात पंचनामे होऊन सुद्धा अनेक ठिकाणी आर्थिक मदत मिळालेली नाही. राज्यात अशी गंभीर स्थिती असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) राजस्थान आणि तेलंगणामध्ये भाजपाच्या (BJP) प्रचारासाठी गेले आहेत. यावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्र्यांवर जळजळीत टीका केली आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले, राज्यातील शेतकरी अवकाळी पाऊस, गारपीट आणि इतर अस्मानी संकटांच्या तडाख्याने त्रस्त आहे. असे असताना जो माणूस स्वत:च्या घराची काळजी न करता बेपर्वाईने दुसऱ्या पक्षाच्या प्रचारासाठी दुसऱ्या राज्यात जात असेल तर असा माणूस राज्याचा कारभार करायला नालायक आहे. अशा माणसाला सत्तेवर राहण्याचा किंवा मी राज्याचा महत्त्वाचा भाग आहे हे बोलण्याचा अधिकार नाही.

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले, अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे शेतकऱ्यांचे खूप नुकसान झाले आहे. कांद्याचे आणि द्राक्षाचे नुकसान झाले आहे. मात्र मुख्यमंत्री स्वत:चे घर सोडून दुसऱ्याचे घर धुंडाळत आहेत. दुसऱ्यांचे घर धुंडाळणारे हे भुरटे शेतकऱ्यांना काय न्याय देणार? शेतीमध्ये मुख्यमंत्री हेलीकॉप्टरने जातात. इतर शेतकऱ्यांचीही तेवढीच प्रगती झाली पाहिजे असे माझे मत आहे.

भाजपावर टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले, भाजपवाले सध्या प्रचारांमधून रेवड्या उडवत आहेत. इतर राज्यांवर रेवड्या वाटणारे महाराष्ट्राला कधी देणार? शेतकऱ्यांना अद्यापही पीकविमा मिळाला नाही? पीकविम्यावरुन शेतकऱ्यांची थट्टा केली जात आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | विवाहितेचा विनयभंग करुन पळवून नेण्याची धमकी, शिवाजीनगर परिसरातील घटना

Adv Pramod Bombatkar | अ‍ॅड. प्रमोद बोंबटकर यांच्याकडे ‘जिल्हा सरकारी वकील (DGP) पदाचा अतिरिक्त पदभार

Pune Drug Case | ललित पाटील प्रकरणात ससून रुग्णालयातील ‘उद्योगी’ कर्मचार्‍याला अटक; ससूनमधील भानगडी समोर येणार?