Uddhav Thackeray | ‘आता असे दिवस येतील की केंद्रातच….’ उद्धव ठाकरेंचा गंभीर इशारा (व्हिडिओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Delhi CM Arvind Kejriwal) आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान (Punjab CM Bhagwant Mann) यांनी बुधवारी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची मातोश्रीवर (Matoshree) भेट घेतली. यावेळी विरोधी पक्षांच्या आघाडीवर सविस्तर चर्चा झाली. या भेटीनंतर तिन्ही नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी गंभीर शक्यता वर्तवली. अरविंद केजरीवाल आणि भगवंत मान राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांचीही भेट घेणार आहेत.

 

 

मातोश्री नातं जपण्यासाठी प्रसिद्ध

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले, अरविंद केजरीवाल गेल्या काही दिवसांत दुसऱ्यांदा मातोश्रीवर आले आहेत. नातं जपण्यात शिवसेना (Shivsena) आणि मातोश्री प्रसिद्ध आहे. काही लोक फक्त राजकारण करतात. आम्ही मात्र राजकारणाच्या पलीकडे जाऊन नातं जपत असतो. राजकारण (Maharashtra Politics News) आपल्या जागी असतं. येणारे वर्ष निवडणुकीचे आहे. यावेळी जर ट्रेन सुटली, तर आपल्या देशातून लोकशाही गायब होईल. लोकशाहीला वाचवण्यासाठी देशातून जे लोकशाही हटवू पाहात आहेत, त्यांनाच मी विरोधी पक्ष म्हणेन असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारवर (Modi Government) हल्लाबोल केला.

 

आता असे दिवस येतील की…

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, मागील काही दिवसांत सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) दोन निकाल दिले आहेत. एक शिवसेनेच्या बाबतीत आणि दुसरा दिल्लीच्या बाबतीत. लोकशाहीत लोकप्रतिनिधी सर्वात जास्त महत्त्व असतं. दिल्ली सरकार आणि ‘आप’च्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय लोकशाहीसाठी (Democracy) आवश्यक होता. पण त्याविरोधात केंद्र सरकारने अध्यादेश काढला. आता असे दिवस येतील की राज्यांमध्ये निवडणुका होणारच नाहीत. फक्त केंद्रात निवडणुका होतील. त्यातही 2024 च्या निवडणुकांमध्ये जनता काय निर्णय देते, त्यावर बरंच काही अवलंबून असेल, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली.

 

 

Web Title :  Uddhav Thackeray | uddhav thackeray slams prime minister narendra modi government on loksabha election 2024

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा