Uddhav Thackeray | विरोध केला म्हणून हल्ला करायला लावला, मुख्य सुत्रधार उद्धव ठाकरे, त्यांची दोन रुपं; शिवसेनेच्या माजी मंत्र्याचा थेट आरोप

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – शिवसेनेचे माजी नेते आणि माजी मंत्री सुरेश नवले (Former Shivsena Minister Suresh Navale) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याबाबत खळबळजनक दावा केला आहे. 1996 च्या युती सरकारमध्येच (Alliance Government) उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री (CM) व्हायचे होते. यासाठी थेट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्याकडे आमदारांचं लॉबिंग करुन मागणी केली होती, असा गौप्यस्फोट सुरेश नवले यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (NCP President Sharad Pawar) यांच्या आग्रहाखातर मी मुख्यमंत्री झाल्याचा उल्लेख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) करतात. पण त्यांच्या या दाव्याबद्दल नवले यांनी धक्कादायक खुलासा केला आहे.

1996 च्या युती सरकारमध्येच उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना मुख्यमंत्री (Chief Minister) व्हायचे होते. त्यासाठी त्यांनी आमदारांचा गट तयार करुन लॉबिंग केली होती. बाळासाहेब ठाकरे यांना भेटावं आणि त्यांच्या कानावर उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करावे, अशी मागणी करण्यास सांगितले होते. मनोहर जोशी (Manohar Joshi) यांना पायउतार करुन स्वत: मुख्यमंत्री व्हायचं होतं, असं खळबळजनक वक्तव्य सुरेश नवले यांनी केलं आहे.

पडद्यावरचा आणि आतला चेहरा वेगळा

उद्धव ठाकरे यांचा दाखवायचा चेहरा पडद्यावरचा आणि आतला वेगळा आहे. राज ठाकरे (Raj Thackeray), नारायण राणे (Narayan Rane) यांनी पडद्याआडच्या चेहऱ्याचा अनुभव घेतला आहे. त्यावेळी विरोध केला म्हणून शिवसेनेच्या मंत्र्यांवरच हल्ला (Attack) देखील करायला लावला होता, त्याचे मुख्य सुत्रधार उद्धव ठाकरे होते, असा थेट आरोप देखील सुरेश नवले यांनी केला आहे.

काय म्हणाले सुरेश नवले?

सुरेश नवले म्हणाले, आमचे मित्र उदय शेट्टी (Uday Shetty) यांना उद्धव ठाकरेंनी माझ्याकडे पाठवलं होतं. बाळासाहेब ठाकरे यांना भेटावं आणि त्यांच्या कानावर उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करावे,
अशी मागणी करण्यास सांगितले होते. त्यामुळे मी, चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire), अर्जुन खोतकर (Arjun Khotkar)
यांच्यासह आणखी काही आमदार जे आता स्वर्गवासी झाले आहेत.
त्यांना घेऊन बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे गेलो होतो. आम्ही बाळासाहेबांना सांगितलं, उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करावे.
यावर बाळासाहेब म्हणाले, या गळ्या आमदारांची इच्छा आहे का? यावर आम्ही सगळ्या जणांनी उत्स्फुर्तपणे होकार दिला.
याचे साक्षीदार अर्जुन खोतकर आहे. चंद्रकांत खैरे आहेत. खैरे हे उद्धव ठाकरे यांच्या हातात काम करत आहेत.
त्यामुळे ते आता नाही म्हणतील, असेही नवले म्हणाले.

उद्धव ठाकरेंची दोन रुपं आहेत

नवले पुढे म्हणाले, मी मंत्रिमंडळात असताना मला शासकीय बंगला होता.
त्यावेळी काही शिवसैनिक मला मारण्यासाठी आले होते. मला धमकी दिली.
महाराष्ट्राच्या विधानसभेत हे प्रकरण काढले. त्यानंतर केंद्रीय मंत्र्याने मला झेड सुरक्षा पुरवली.
त्यामागे कदाचित उद्धव ठाकरे यांचा हात असावा. बाळासाहेबांच्या पाठीमागे उद्धव ठाकरे हेच सर्व सुत्र हलवत होती.
त्यांची दोन रुपं आहेत, असा आरोप त्यांनी केला.

Web Title :- Uddhav Thackeray | uddhav thackeray wanted to be cm in the 1996 government say suresh navale

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Maharashtra Politics | पेंग्विनने खुप प्रसिद्धी दिली…तुम्ही पेंग्विन सेना बोलत रहा, आदित्य ठाकरेंचा शिंदे गट आणि भाजपाला टोला

World Table Tennis Championships | जागतिक टेबल टेनिस स्पर्धेत भारतीय संघाची विजयी सुरुवात, उझबेकिस्तानचा केला पराभव