Uddhav Thackeray vs Eknath Shinde | ‘आदित्यला विठ्ठलाभोवतीचा बडवा म्हणता, मग स्वत:चा मुलगा खासदार, हे कसं चालतं?’ – CM उद्धव ठाकरे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Uddhav Thackeray vs Eknath Shinde | शिवसेना (Shivsena) पक्षात उफाळलेल्या राजकीय घडामोडीनंतर शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राज्यातील शिवसेना जिल्हाप्रमुखांशी ऑनलाईन माध्यमातून संवाद साधला. त्यावेळी त्यांनी शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. बंडखोर आमदार मुंबईत यायला तयार नसल्याने उद्धव ठाकरे चांगलेच संतापले. ‘आधी बाळासाहेब विठ्ठल आणि आम्ही बडवे, आता मी विठ्ठल आणि इतर बडवे हीच गोष्ट उद्या आदित्यसोबतही (Aaditya Thackeray) घडणार नाही का? आदित्यला बडवे म्हणायचं आणि स्वत:चा मुलगा खासदार हे कसं चालतं?’ असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला. (Uddhav Thackeray vs Eknath Shinde)

 

“सेनेच्या अस्तित्वावर बोलणाऱ्यांना निष्ठा काय असते दाखवावी लागेल. मला या सगळ्या गोष्टीचा वीट आला आहे. पण ही वीट आता मी डोक्यात हाणणार आहे,” असा इशाराच उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. पुढे ते म्हणाले, “एकनाथ शिंदे यांच्यासाठी मी काय कमी केलं? नगरविकास खातं दिलं. माझ्याकडची 2 खाती दिली” सत्ता आल्यानंतर आधी कोव्हिडचं विचित्र लचांड गेल्या दोन वर्षांपासून मागे लागलं आहे. कोव्हिड संपतो तर मानेचा त्रास सुरु झाला आणि आता हा त्रास. कोण कोणत्या वेळी कसं वागेल हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे.”

“मी त्या दिवशी मनातलं सगळं सांगितलं, आजही मन मोकळं करतो. माझ्या मानेवर शस्त्रक्रिया गरजेची होती.
मोदीही म्हणाले होते, ऑपरेशन हे हिंमतीचं काम आहे, पण हिंमत माझ्या रक्तातच आहे.
पहिल्या ऑपरेशनच्या वेळी सगळं ठीक होतं, मग शरीराला त्रास होऊ लागला. शरीराचे काही भाग बंद पडत होते,
म्हणून दुसरं ऑपरेशन केलं. त्याचा फायदा घेत विरोधकांनी डाव साधण्याचा प्रयत्न केला असल्याचं,” उद्धव ठाकरे म्हणाले.

 

Web Title :- Uddhav Thackeray vs Eknath Shinde | cm uddhav thackeray slams shivsena rebel leader eknath shinde Maharashtra Political Crisis

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Maharashtra Political Crisis | मुख्यमंत्री ठाकरेंच्या समर्थनासाठी कोल्हापूरात शिवसैनिकांचा रस्त्यावर उतरून ‘एल्गार’

 

Chandrakant Patil | ‘… तर राज्यातील घडामोडींशी भाजपचा संबंध नाही’ – चंद्रकांत पाटील

 

CM Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; ‘जे गेलेत त्यांचा विचार करू नका….’