खरंच मुख्यमंत्रिपदाचा शब्द उद्धव ठाकरेंना दिला होता ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन –  विधानसभेच्या निवडणूक ( assembly Election) निकालानंतर राज्यातील राजकारणाने एक वेगळाच रंग घेतला. शिवसेना ( Shivsena) आणि भाजप ( BJP) यांच्यामध्ये मुख्यमंत्रीपदावरून बिनसलं आणि त्यानंतर शिवसेनेनी भाजपशी असलेली युती तोडून काँग्रेस ( Congress ) आणि राष्ट्रवादीसोबत ( NCP) आपलं संधान बांधलं. त्यानंतर राज्यात महाविकास आघडीचे सरकार स्थापन झाले. मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे ( Uddhav Thackery) यांनी शपथ घेतली. या सरकारला आता एक वर्ष पूर्ण होत आहे. पण भाजपाने खरचं मुख्यमंत्रिपदाचा शब्द शिवसेनेला दिला होता का? हा प्रश्न मात्र अजूनही अनुत्तरित आहे. मागील काळात भाजप आणि शिवसेना एकत्र असले तरी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून अनेकदा सरकारविरोधी भूमिका घेण्यात आली होती. यामुळे लोकसभेमध्ये शिवसेना-भाजपा एकत्र येणार का? याची चर्चा चांगलीच रंगली होती. फेब्रुवारी २०१९ मध्ये उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात एका मध्यस्थीच्या माध्यमातून एक बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत उद्धव ठाकरे यांच्याकडून देवेंद्र फडणवीसांसमोर अडीच वर्षाचा मुख्यमंत्रिपदाचा प्रस्ताव ठेवण्यात आला. ज्यावर देवेंद्र फडणवीस म्हणले हे कठीण आहे पण मी अमित शहांशी बोलून तुम्हाला सांगतो. यानंतर देवेंद्र फडणवीस दुसऱ्या रुममध्ये गेले आणि तिथून अमित शहांना फोन लावला, तेव्हा अमित शहांनी स्पष्ट शब्दात युती तुटली तरी चालेल असे सांगितले होते.

या घटनेनंतर काही दिवसांनी त्याच मध्यस्थीच्या माध्यमातून पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेंची बैठक झाली त्यामध्ये उद्धव ठाकरे यांनी ३ प्रमुख मागण्या आणि १ विशेष मागणी देवेंद्र फडणवीसांसमोर मांडली. त्यामध्ये पहिली मागणी अशी की, आम्हाला समसमान जागावाटप हवं, दुसरी आम्हाला कॅबिनेटमध्ये चांगली खाती मिळायला हवी आणि तिसरी मागणी पालघरची जागा शिवसेनेसाठी सोडण्यात यावी अश्या मागण्या करण्यात आल्या होत्या. याशिवाय एक विशेष मागणी अशी होती कि या सगळ्या मागण्या मान्य करून अमित शाह यांनी स्वतः मातोश्री वर येऊन शब्द द्यावा. या सर्व मागण्या भाजपकडून स्वीकारण्यात आल्या. त्यानंतर जवळपास तुटायला आलेली युती पुन्हा जुळली. यानंतर पत्रकार परिषदेत युतीची घोषणा करण्यात आली. लेखिका प्रियम गांधी यांनी लिहिलेल्या पुस्तकात या गोष्टींचा उल्लेख करण्यात आला आहे.

ज्यामध्ये प्रियम गांधी यांनी भाजपामुळे युती तुटल्याचा शिवसेनाचा दावा खोटा असल्याचं म्हटलं आहे. भाजपाने शिवसेनेला अडीच अडीच वर्षाचं मुख्यमंत्रिपद देण्याचा शब्द दिला होता असे शिवसेकडून सांगण्यात आले होते. यावर लेखिकेने लिहिले कि, युती तुटण्याचे साक्षीदार आहेत परंतु मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिल्याचा कोणीही साक्षीदार नाही. जो सांगेल कि माझ्यासमोर भाजपाने शब्द दिला होता. मला हे पुस्तक लिहिण्यास जवळजवळ ९ ते १० महिने लागले. ज्यादिवशी शपथविधी सोहळा झाला तेव्हा मी पुस्तक लिहिण्यास सुरुवात केली असे लेखिकेने सांगितले आहे. विधानसभा निवडणुकीवेळी मित्रपक्षांना सोडू नये अशी अमित शहांची इच्छा होती,त्यामुळे मध्यस्थीच्या माध्यमातून उद्धव ठाकरेंकडे प्रस्ताव पाठवण्यात आला. या प्रस्तावात असे लिहिले होते कि शिवसेनेला पसंतीच्या १४० जागांमधील १२४ जागा भाजपा त्यांना देईल त्यामुळे हि विधानसभेत हि युती टिकली. आता जे सरकार बनले आहे ते मोदीजी किंवा बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारधारेचे सरकार नाही आहे सर्व मतदारांना मुर्ख बनवण्यात आलं आहे. यामुळे मी हे पुस्तक लिहिण्याचं ठरवलं, जेणेकरून राज्यातील जनता आणि युवकांना सत्य जाणून घेण्याचा अधिकार आहे असे लेखिका प्रियम गांधी यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

You might also like