जे सावरकरांना मानत नाही त्यांना भर चौकात ‘फटकवले’ पाहिजे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंनी दिल्लीतील घटनेवर आक्रमक भूमिका घेतली आहे. ते म्हणाले की, जे कोणी स्वातंत्र्यवीर सावरकरांना मानत नाही. त्यांना भर चौकात फटकवायला हवे. दिल्ली विद्यापीठात असणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली होती त्यावर उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली.

उद्धव ठाकरेंनी शेतकरी पिकविम्या संबंधात पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी दिल्लीतील घटनेबाबत उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारला असता त्यांनी त्यावर नाराजी व्यक्त केली.

दिल्ली विद्यापीठात शहीद भगतसिंग, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे पुतळे आहेत. मात्र सावरकरांच्या पुतळ्याला एनएसयूआयने आक्षेप घेतल्याने विद्यापीठात तणावाची परिस्थिती होती.

दिल्लीतील स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्याची विटंबना काँग्रेसप्रणित नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांनी केल्याचा आरोप आहे. मात्र काँग्रेसने हे आरोप फेटाळले आहेत. या घटनेची चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी अभाविपकडून करण्यात आली आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like