‘या’ पोलिसांनी दडपशाही करून उध्दव ठाकरेंच्या अभिनंदनाचे ‘फलक’ हटवले

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्रात सरकार स्थापनेचे तीव्र पडसाद बेळगावमध्ये उमटलेले आहेत. बेळगावमध्ये उद्धव ठाकरे यांच्या अभिनंदनाचे फलक लावण्यात आले होते मात्र बेळगाव पोलिसांनी दडपशाही करत हे फलक हटवले आहेत. यामुळे संपूर्ण बेळगावमधील मराठी भाषिक जनतेमध्ये एक संतापाची लाट तयार झाली आहे.

धर्मवीर संभाजी चौकात लावलेले मुख्यमंत्र्यांच्या अभिनंदनाचे फलक पोलिसांनी हटवले. एवढेच नाही तर चंदगडच्या आमदार राजेश पाटील यांचेही फोटो जाळले. शपथ घेताना आमदार पाटील यांनी सीमावासियांचा उल्लेख केला होता. कन्नड संघटनांकडून आमदार पाटील यांच्या पोस्टर्सची होळी करण्यात आली. सेंट झेव्हियर्स शाळेसमोर आमदार पाटील यांची प्रतिमा दहन करुन पाटील यांचा निषेध करण्याचा प्रयत्न केला आहे. यावेळी जनतेमध्ये तीव्र संतापाची लाट पहायला मिळाली.

विधानसभेत बेळगावसह संयुक्त महाराष्ट्राची मागणी

आमदार राजेश पाटील यांच्या घोषणाने महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागात राहणाऱ्या मराठी बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, कन्नड संघटनांनामध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. बेळगावातल्या कन्नड रक्षण वेदिकेच्या काही कार्यकर्त्यांनी आमदार राजेश पाटील यांचा फोटो जाळून त्यांचा निषेध केला आहे. बेळगावात मराठी आणि कन्नड लोक सामंजस्याने राहतात. परंतु राजेश पाटील यांच्या वक्तव्याने वातावरण बदल्याचे पहायला मिळाले.

काय म्हणाले होते नेमके राजेश पाटील –

चंदगड विधानसभा मतदारसंघातीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार राजेश पाटील यांनी गुरूवारी (27 नोव्हेंबर) महाराष्ट्राच्या विधिमंडळात आमदारकीची शपथ घेतली. आमदार राजेश पाटील यांनी सीमाभागातील नागरिकांचे स्मरण करुन शपथ घेतली होती. यानंतर त्यांनी बेळगाव, निपाणी, बिदर, भालकी, कारवारसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहीजे, अशी मागणी केली. त्यानंतर ‘जय हिंद! जय महाराष्ट्र! जय सीमाबांधव!’ अशा घोषणा दिली होती.

Visit : Policenama.com