तानाजी सावंतांचा ‘तोरा’ पाहून मुख्यमंत्र्यांचा ठाकरे शैलीत ‘जय महाराष्ट्र’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाविकास आघाडीचा मंत्रिपदाचा विस्तार झाला असून त्यात अनेकांना मंत्रिपदापासून मुकावे लागले त्यामुळे अनेक नेते नाराज असल्याचे दिसत आहे. अशात महाविकास आघाडीतील सरकारमध्ये मंत्रीपदासाठी प्रबळ दावेदार असलेले तानाजी सावंत यांना शिवसेनेकडून डावलण्यात आले आहे. खरतर तानाजी सावंत यांचा युती सरकारमधील मंत्रीपदाचा कार्यकाळ हा वादग्रस्त राहिला आहे. त्यामुळे त्यांच्या मंत्रीपदाची संधी हुकली अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. दरम्यान तानाजी सावंत यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती परंतु त्यांच्या पदरी निराशा आल्याचे सूत्रांकडून समजले.

युती सरकारच्या काळात तानाजी सावंत यांच्याकडे जलसंधारण मंत्री होते आणि त्यांच्याच काळात तिवरे धरण फुटले होते. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यावेळी सावंतांनी सांगितले की खेकड्यांनी धरण पोखरले म्हणून ही घटना घडली अशी अजब प्रतिक्रिया दिली होती. या वक्तव्यामुळे ते सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल झाले होते. या व्यतिरिक्त महाराष्ट्राला भिकेला लावेल असं वादग्रस्त वक्तव्यही त्यांनी केलं होतं. त्यावरुनही विरोधकांनी त्यांच्यावर मोठी टीका केली होती. या वादाच्या भोवऱ्यात सापडल्याने शिवसेनेनं तानाजी सावंतांना डावलल्याची चर्चा सुरु आहे. शिवाय त्यानंतरही तानाजी सावंत आणि उद्धव ठाकरेंमध्ये खटके उडाल्याची चर्चा होती. यामुळेच त्यांचा विचार करण्यात न आल्याचे वृत्त समोर येत आहे.

दरम्यान आमदार तानाजी सावंत यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती. उद्धव ठाकरेंच्या भेटीत त्यांना अपेक्षित उत्तर न मिळाल्याने यापुढे मी कधीही मंत्रिपदासाठी मातोश्रीवर येणार नाही, असे सावंत यांनी म्हटले. सावंतांचा हा तोरा पाहून उद्धव ठाकरेंनीही ठाकरे शैलीत ‘जय महाराष्ट्र’ म्हणत त्यांना निरोप दिला, असे वृत्त एका वृत्तवाहिनीने दिले आहे. त्यामुळे सावंत आणि ठाकरेंमध्ये खटके उडाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. दरम्यान, सोलापूरमध्ये येथील शिवसेना नेत्यांनी घेतलेल्या बैठकीत उद्धव ठाकरेंकडे सावंत यांच्या मंत्रिपदासाठी साकडे घालण्याचं ठरवलं आहे, असे बार्शीतील शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर यांनी स्पष्ट केले आहे.

विधानसभा निवडणुकांच्या काळात सावंत यांच्यावर शिवसेनेने मोठी जबाबदारी टाकली होती. अनेक उमेदवाऱ्या देखील त्यांनीच निश्चित केल्या होत्या. सोलापूर जिल्ह्यातील करमाळ्याचे विद्यमान आमदार नारायण पाटील यांची उमेदवारी कापण्यासाठी तानाजी सावंत यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली होती. त्यांनी राष्ट्रवादीतून शिवसेनेत आलेल्या रश्मी बागल यांना उमेदवारी मिळवून दिली होती. मात्र रश्मी बागल यांना मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. बागल यांच्यापेक्षा तब्बल २० हजार अधिक मते घेऊन नारायण पाटील विजयी झाले. त्यामुळे शिवसेनेने सावंत यांना मंत्रीपदापासून दूर केले, की मग खेकड्यांच्या बेजबाबदार वक्तव्यामुळे डावलले याचा खुलासा अजून झालेला नाही.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/

मधुमेह असल्यास आहारामध्ये करा ‘या’ ४ पदार्थांचा समावेश
‘हे’ ७ उपाय केल्यास सतत येणारा थकवा जाईल पळून, जाणून घ्या
जेवण पॅक करण्यासाठी ‘फॉईल पेपर’ वापरता ? ‘हे’ ७ दुष्परिणाम जाणून घ्या
मासिक पाळीत स्वच्छता राखण्यासाठी ‘या’ ६ गोष्टी लक्षात ठेवा !
गूळ खाण्याने वाढते वजन, जास्त खाण्याचे ‘हे’ ६ तोटे जाणून घ्या
मातेच्या स्तनपानामुळे बाळांना होतात ‘हे’ ६ फायदे, जाणून घ्या
लवंग खाण्याचे ‘हे’ ६ आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहीत आहेत का ?