उद्धव ठाकरेंचा ‘निरोप’ राज्यपालांना राऊत पोहचविणार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात जी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामागील शिवसेनेची भूमिका स्पष्ट करण्यासाठी शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे राज्यपालांची सायंकाळी भेट घेणार आहे. आपण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलेला निरोप राज्यपालांपर्यंत पोहचविणार असल्याचे राऊत यांनी सांगितले आहे.

शिवसेनेला ५० -५० टक्के सत्तेचा वाटा मिळावा, ही मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फेटाळून लावल्यानंतर शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. आज शिवसेनेने आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आपण सायंकाळी राज्यपालांची भेट घेणार असल्याचे सांगितले. या भेटीत शिवसेनेची भूमिका स्पष्ट करणार आहे.

सत्ता स्थापनेबाबत उद्धव ठाकरे यांच्यांशी आपले बोलणे झाले असून त्यांचा निरोप राज्यपालांना पोहचविणार आहे, असे सांगितले. त्यामुळे शिवसेना सत्ता स्थापनेचा दावा करणार का अशी चर्चा सुरु झाली आहे. नागपूरच्या तरुण भारतमधून संजय राऊत यांच्यावर आजच्या संपादकीयमधूनजोरदार टिका करण्यात आली आहे. महायुतीचे सरकार बनण्यात संजय राऊत हे खोडाघालत असल्याचे टिका करुन त्यांना बेताल, विदुषक अशी विशेषणे बहाल केली आहे. यावर संजय राऊत यांनी आपल्याला तरुण भारत माहिती नाही, असे सांगत या टिकेकडे दुर्लक्ष केले.

Visit : Policenama.com