ठरलं ! आता राज्यात ‘ठाकरे’ सरकार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – आज राज्यात अनेक चमत्कारपूर्वक घटना घडल्या. रात्रीत स्थापन झालेले सरकार दोन दिवसात कोसळलं. जेवढ्या घाईने फडणवीस यांनी सरकार स्थापन केले तेवढ्या घाई घाईत हे सरकार कोसळलं. अजित पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी देखील मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर आज झालेल्या हॉटेल ट्रायडंटमधील महाविकासआघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरेंच्या नावाची मुख्यमंत्री म्हणून घोषणा करण्यात आली.

त्यामुळे मुख्यमंत्री कोण यावर असलेल्या संभ्रम आता दूर झाला आहे. महाविकासआघाडीच्या नेत्यांकडून सांगण्यात येत होते की उद्धव ठाकरेंच मुख्यमंत्री होणार, आज अखेर ते स्पष्ट झाले. जयंत पाटलांनी यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंच्या नावाची घोषणा केली.

भाजप सरकार स्थापन होण्याचापूर्वी शरद पवार यांनी सांगितले होते की मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच होणार, नेतृत्वाबाबत आमच्यात दुमत नाही. त्यानंतर आज उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री होणार हे स्पष्ट झाले आहे.

महाविकासआघाडीच्या या तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाला मान्यता दिली आहे. त्यामुळे महाराष्ट्राला शिवसेनेचा मुख्यमंत्री मिळाली आहे. 1 डिसेंबरला उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदाची शिवतीर्थावर शपथ ग्रहण करतील.

Visit : Policenama.com