उद्धव ठाकरेंची शिवसेना ‘लाचारी’ पत्करणारी : नितेश राणे

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात निवडणूका पार पडल्या, सर्वात मोठा पक्ष भाजप ठरला. परंतु सत्तास्थापनेत मात्र अपयशी ठरला. असे झाल्याने नुकतेच भाजपात प्रवेश केलेल्या राणे पिता पुत्रांची मात्र निराशा झाली. त्यानंतर सरकारवर वेळ साधून राणे पिता पुत्रांने जोरदार हल्लाबोल केला. आज देखील नितिश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. नितेश राणे म्हणाले की शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना हिंदुत्व मानणारी होती. परंतु उद्धव ठाकरे यांची शिवसेना लाचारी पत्करणारी आहे. दोन्ही शिवसेनेत फरक असून पुढील पाच वर्ष कोणत्याही टोकाची लाचारी पत्करण्यास उद्धव ठाकरे तयार असतील.

नितेश राणे पुढे म्हणाले की, दरवर्षी नागपूरात हिवाळी अधिवेशन होतं आणि या माध्यामातून समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देण्याचं काम होतं. हिवाळी अधिवेशन सुरु होऊन 4 दिवस झाले परंतु नव्या सराकरने कोणत्याही प्रकारचे निर्णय घेतले नाहीत. हे सरकार अपयश ठरलं आहे. राज्यातील जनतेचा यामुळे अपेक्षा भंग झाला असून आता जनतेनेच सत्ताधारी पक्षाला जाब विचारायला हवा.

महाविकासआघाडीवर टीका करताना ते म्हणाले की सत्ताधारी पक्षाकडून मंत्रिमंडळ तयार करण्यात आले, बैठका झाल्या, मात्र त्यात नागरिकांच्या हिताचे निर्णय घेण्यात आले नाहीत. फक्त प्रकल्पांना स्थगिती देण्याचं काम झालं, त्यामुळे हे सरकार विकास विरोधी आहे असा आरोपी देखील त्यांनी केला.

राज्यपालांच्या अभिभाषणावर सभागृहातील भाजपच्या सर्व आमदांरांनी भूमिका मांडली. त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांनी राज्याची स्थिती, कोणत्या उपाययोजना केल्या पाहिजेत. याशिवाय आमदारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाचे उत्तर देणं अपेक्षित होतं. परंतु त्यांनी उत्तर देण्याऐवजी सभागृहात ओव्या आणि प्रवचन सांगून घरी निघून गेले असेही नितेश राणेंनी सांगितले.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/