काँग्रेस, राष्ट्रवादीच्या मागणीमुळं उध्दव ठाकरेंसमोर मोठा ‘पेच’, मंत्रिमंडळ विस्तारात अग्निपरीक्षा !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात राष्ट्रवादी, कॉग्रेस आणि शिवसेनेने महाविकास आघाडी करत सरकार स्थापन केले मात्र महिना उलटून गेल्यानंतरही मंत्री मंडळ विस्ताराला काही मुहूर्त सापडत नाहीए. काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये मंत्री पदावरून मोठा पेच निर्माण झाल्यामुळे आता उद्धव ठाकरे यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागणार आहे.

30 डिसेंबरपर्यंत मंत्रिमंडळ विस्तार होईल असे सांगण्यात येत आहे सम समान कार्यक्रमाची आखणी करत राज्यात महाविकास आघाडी सत्तेवर आली होती त्यानंतर आता काँग्रेसकडून उपमुख्यमंत्री पदाची मागणी होत असल्यामुळे उद्धव ठाकरे नेमका मंत्री मंडळ विस्तार कसा करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

काँग्रेसकडून पृथ्वीराज चव्हाण आणि अशोक चव्हाण हे दिग्गज नेते देखील मंत्री पदाच्या शर्यतीत असल्यामुळे काँग्रेसकडून काही महत्वाच्या मंत्री पदांची मागणी करण्यात येत आहे. सध्या काँग्रेसकडं महसूल, सार्वजनिक बांधकाम आणि समाजकल्याण खाती आहेत. मात्र काँग्रेसकडून उद्योग खात्याची मागणी केली जात आहे. जे की सध्या सुभाष देसाई यांच्याकडे आहे.

राष्ट्रवादीतुन देखील उपमुख्यमंत्री पदावरून अद्याप स्पष्टता आलेली नाही. उपमुख्यमंत्री पदासाठी जयंत पाटील आणि अजित पवार यांचे नाव चर्चेत होते. काँग्रेसच्या कमी जागा असून देखील काँग्रेसला अनेक महत्वाची खाती देण्यात आलेली आहेत. त्यामुळे आता तीनही पक्षांमध्ये सम समान खातेवाटप करून हा तिढा सोडवणे हे उद्धव ठाकरेंसमोर मोठे आव्हान आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/