बंडखोर शिवसेना समर्थकांचे वादळ शमणार ; रवींद्र गायकवाड मातोश्रीवर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – उस्मानाबाद येथून रवींद्र गायकवाड यांची उमेदवारी कापल्यामुळे नाराज झालेल्या समर्थकांनी थेट मुंबई गाठली. रवींद्र गायकवाड यांचे समर्थक गाड्या भरून मातोश्रीवर दाखवाल झाले होते. मात्र, ऐन निवडणूकीच्या तोंडावर बंडखोरी नको म्हणून मातोश्रीवरून त्यांची दखल घेण्यात आली असून रवींद्र गायकवाड आणि त्यांच्या समर्थकांना उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर बोलावले. पक्षेष्ठींनीच बोलवल्यामुळे बंडखोरीचे वादाला शमणार असे चित्र आहे.

रवींद्र गायकवाड यांचे समर्थक मातोश्रीवर

उस्मानाबादमधून रवींद्र गायकवाड यांचं तिकीट कापल्यानंतर नाराज झालेल्या समर्थकांनी आंदोलन केले होते. त्यानंतर मोठ्या प्रमाणावर नाराज असलेल्या शिवसैनिकांनी मातोश्रीकडे धाव घेतली होती. परंतु, पोलिसांनी त्यांना आधीच अडवले. हा वाद शमण्याआधीच अमरावतीमध्ये आनंदराव अडसूळ यांच्या उमेदवारीवरून नाराज असलेले शिवसैनिक मातोश्रीवर गेले आहेत. परंतु, त्याआधीच त्यांनी आज आपला उमेदवारी अर्ज भरला आहे.

आत्मदहनाचा प्रयत्न

उमरगा शहरात आयोजित करण्यात आलेल्या शिवसैनिकांच्या बैठकीमध्ये रवींद्र गायकवाड यांना तिकीट देण्याची मागणी करण्यात आली होती. पक्षानं तिकीट दिलेल्या ओम राजेनिंबाळकर यांचा प्रचार करणार नाही, असा इशाराही शिवसैनिकांनी दिला होता. सगळ्यात धक्कादायक म्हणजे एका शिवसैनिकाने भर सभेमध्ये या समर्थकाने अंगावर रॉकेल ओतत स्वत:ला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला.