‘या’ महत्वाच्या कारणामुळं 1 डिसेंबर ऐवजी 28 नोव्हेंबरला झाला ‘शपथविधी’, जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपचे साडे तीन दिवसांचे सरकार कोसळल्यानंतर महाराष्ट्र विकास आघडीचे सरकार स्थापन होणार हे निश्चित झाले. उद्धव ठाकेर यांनी शिवतीर्थावर मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तब्बल वीस वर्षांनी शिवसेनेच्या नेत्याने मुख्यमंत्र्याची शपथ शिवतीर्थावर घेतली. उद्धव ठाकरे यांचे नाव मुख्यमंत्री पदासाठी निश्चित झाल्यानंतर 1 डिसेंबर रोजी शपथविधी सोहळा होणार असल्याचे जाहीर करण्यात आले. मात्र, त्यानंतर शपथविधीची तारीख बदलून 28 नोव्हेंबर करण्यात आली. संध्याकाळी 6 वाजून 40 मिनीटांनी शपथविधीचा मुहूर्त ठरला.

शिवसेनेकडून 1 डिसेंबरला होणाऱ्या शपथविधीची तारीख बदलण्याचे मागचे खरे कारण समोर आले आहे. वृषभ लग्न मुहूर्त असल्याचे जाणकारांनी सांगितलेय. हा खूप शुभ मुहूर्त आहे आणि या मुहूर्तावर केल्या जाणाऱ्या कार्याला स्थिरता प्राप्त होते, असे ज्योतिशास्त्रानुसार सांगितलं जातंय. या कारणामुळे आणि राजकीय अस्थीरता लक्षात घेता, हा मुहूर्त ठरविण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. तसेच शपथविधी समारंभाच्या वेळी अमृत चौघडी हा योग होता. यावर चंद्राची छाया असते, असे म्हटले जाते. अमृत चौघडीवर चंद्राची छाया असल्याने या दरम्या जी कार्य केली जातात त्या कार्य़ाला शंभर टक्के यश मिळते.

अशी बदलली तारीख
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे 1 डिसेंबरला शपथ घेणार आहेत, असे सांगितले जात होते. मात्र काही वेळानंतर ही तारीख 28 नोव्हेंबर करण्यात आली. संध्याकाळी 6 वाजून 40 मिनीटांनी बनत असलेला हा अमृत चौघडी योग साधण्यासाठी शपथविधीची तारीख बदलण्यात आली. सुत्रांच्या माहितीनुसार, उद्धव ठाकरे यांच्या सौभाग्यवती रश्मी ठाकरे यांनी शिवाजी पार्क येथील मंदिरातील पुजाऱ्याला पंचांग घेऊन पाचारण केले होते. पंचांग पाहूनच शपथविधीचा मुहूर्त काढला गेला.

2021 मध्ये अंर्तकलहाचा योग
शुभमुहूर्तावर शपथविधी झाला असला तरी ज्योतिषशास्त्रानुसार 2021 नंतर अंर्तकलहाचा योग सांगिलला गेलाय. याचे कारण म्हणजे शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन पक्षांनी एकत्र येऊन बनवलेले हे सरकार आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांची विचारसरणी वेगळी असल्याने त्याचा परिणाम भविष्यात होऊ शकतो. ज्योतिषशास्त्राने वर्तवलेले भविष्य खरे ठरते का हे येणारा काळच सांगेल.

Visit : Policenama.com