वेळ आली तर राम मंदिरासाठी १९९२ची पुनरावृत्ती करू : उद्धव ठाकरे

अयोध्या : वृत्तसंस्था – सध्या राज्यात मंत्रिमंडळाचा विस्तार होत आहे. त्यामुळे सर्व नेते तेथे उपस्थित आहेत. मात्र शिवसेना पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरे हे अयोध्यावारीवर आहेत. लोकसभा निवडणुकीत यश मिळावे म्हणून उद्धव ठाकरेंनी श्रीरामाचे दर्शन घेत प्रार्थना केली होती. त्यानंतर लोकसभेत शिवसेना-भाजप युतीला चांगले यश मिळाले. राज्यात शिवसेनेचे १८ खासदार निवडून आले. या १८ खासदारांना घेऊन उद्धव ठाकरे श्री रामाच्या दर्शनासाठी आले आहेत. तेथे त्यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यात राम मंदिराविषयी आणि त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींची भूमिका यावर वक्तव्य केले. राम मंदिर बनणार म्हणजे बनणारच, असा विश्वास उद्धव ठाकरेंनी यावेळी व्यक्त केला.

राम मंदिर तर होणारच, राम मंदिर ही लोकांच्या मनातली भावना, हिंदूंनी एकत्र राहायला हवं, असं आवाहन त्यांनी यावेळी केले. तसंच मोदींमध्ये राम मंदिर उभारण्याची हिंमत आहे. लवकरात लवकर राम मंदिर होणार. आम्ही सगळे मिळून मंदिर बांधणार, असा विश्वास त्यांनी यावेळी बोलून दाखवला.

राम मंदिराविषयी बोलताना उद्धव ठाकरेंनी आक्रमक होत, राम मंदिर बनविण्यासाठी वाटेल ते करायला तयार आहोत, असं म्हटलं. तसंच राम मंदिरासाठी १९९२ची पुनरावृत्ती करण्याची वेळ आल्यास तशीही तयारी आहे, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटले. राम मंदिर हा निवडणुकीचा मुद्दा नाही, राम मंदिराबाबत कायदा व्हावा आणि राम मंदिर लवकरात लवकर बनावं हीच इच्छा आहे. राम मंदिर बनणार म्हणजे बनणार, असा निश्चयच त्यांनी यावेळी केला.

दरम्यान, लोकसभेच्या यशानंतर शिवसेना जोरदार तयारी करत आहेत. त्याचाच एक भाग म्हणजे शिवसेनेची अयोध्यावारी हे म्हणायला हरकत नाही.

सिने जगत –

‘या’ ४ ‘टॉप’च्या अभिनेत्रींना ‘सुंदर’ दिसण्यासाठी ‘मेकअप’ची अजिबात नाही गरज

अभिनेत्री प्रियंका चोपडा सलमान खानच्या ‘भारत’ चित्रपटाबाबत मोठं वक्‍तव्य

‘या’ 3 ‘बोल्ड’ अभिनेत्रींनी ‘लव्ह’ मॅरेज केल्यानंतर पतीवर केले लैंगिक अत्याचाराचे गंभीर आरोप

‘नक्षली’ होते मिथुन चक्रवर्ती ; भावाच्या मृत्यूनंतर झाले ‘असे काही’ की बनले ‘डिस्को डान्सर’