मला शिवसेनेतून बाहेर काढण्यासाठी उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांना दिली होती धमकी : नारायण राणे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – शिवसेना सोडण्यामागचं खरं कारण आपल्या आत्मचरित्रातून समोर येईलच असे नारायण राणे यांनी एका मुलाखतीत सांगितलं होत. त्यानंतर आता महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांनी आत्मचरित्रातून शिवसेनेविषयी खळबळजनक खुलासे केले आहे. उद्धवजींनी मला पक्षातून काढण्याची मागणी केली, राणे पक्षात परत आल्यास मी आणि रश्मी ठाकरे घर सोडून जाऊ, अशी धमकी उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांना दिली होती तसेच मनोहर जोशींमुळेच शिवसेनेची वाट लागल्याचा उल्लेखही राणेंनी केला आहे. एका वृत्तवाहिनीनं याविषयी वृत्त दिलं आहे.

काय म्हणाले नारायण राणे
१४ एप्रिल २००५ रोजी रवींद्र नाट्य मंदिरात मी चुकीच्या पद्धती शिवसैनिकांसमोर आणण्याचा प्रयत्न केला, त्याच वेळी उद्धवजींनी मला पक्षातून काढण्याची मागणी केली. मी राजीनामा दिल्यानंतर बाळासाहेबांनी मला फोन केला. जेव्हा हे उद्धव ठाकरेंना समजले, तेव्हा ते बाळासाहेबांकडे गेले. राणे पक्षात परत आल्यास मी आणि रश्मी ठाकरे घर सोडून जाऊ, अशी धमकी उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांना दिली. काही प्रामाणिक शिवसैनिकांकडून मला समजली.

माझ्यासाठी मुख्यमंत्रिपद सोडावं लागल्यानं जोशींच्या मनात एक प्रकारचा राग होता. वरकरणी जरी जोशी शिवसेनेचे चिंतक असल्याचे वाटत असले तरी त्यांच्या निर्णयामुळे पक्षाची आज अशी परिस्थिती झाली आहे. जोशी उद्धवजींच्या जवळचे होऊ लागले होते. जोशींमुळेच शिवसेनेची वाट लागली आहे.

नारायण राणे सध्या आत्मचरित्र लिहीत असून लवकरच त्याचे प्रकाशन होईल अशी माहिती त्यांचे पुत्र आमदार नितेश राणे यांनी ट्विटरद्वारे दिली होती. नितेश राणे यांनी ट्विटमध्ये म्हंटल होत की, ‘माझे मार्गदर्शक आणि वडील नारायण राणे यांचे आत्मचरीत्र येणार असून अब आएगा मजा, सबका हिसाब होगा. त्यानंतर आपल्या आत्मचरित्रांतून शिवसेनेविषयी अनेक गुपितं उघड करण्याचे संकेत दिले राणे यांनी दिले होते.

Loading...
You might also like