उमेदवारी अर्ज दाखल करताच उध्दव ठाकरेंचा मुख्यमंत्री पदावर टिकून राहण्याचा मार्ग मोकळा, जाणून घ्या मतांची संख्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी शेवटच्या दिवशी आपला अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज भरताना उद्धव ठाकरे यांच्यासमवेत त्यांची पत्नी रश्मी, मुलगा आदित्य आणि तेजस यांच्यासह संजय राऊत, सुभाष देसाई आणि एकनाथ शिंदे यांच्यासारखे सेनेचे अनेक ज्येष्ठ नेते होते. याशिवाय राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री जयंत पाटील उपस्थित होते. त्याचवेळी बाळासाहेब थोरात आणि कॉंग्रेसचे अशोक चव्हाण हे देखील समर्थनासाठी उपस्थित होते. दरम्यान, उद्धव ठाकरे 28 नोव्हेंबर 2019 रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आणि नियमानुसार 6 मेच्या आत म्हणजे 28 मेपूर्वी त्यांना आमदार होणे आवश्यक होते. विधानसभेऐवजी त्यांनी विधानपरिषदेचा मार्ग निवडला आहे.

सुरूवातीला उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री पदावर टिकून राहण्यासाठी धोका निर्माण झाला कारण लॉकडाऊनमुळे विधानपरिषद निवडणुका होणार की नाही याबाबत ठाम माहिती नव्हती. दुसरीकडे, नामांकित जाागेवरून उद्धव यांना आमदार करण्याबाबत राज्यपाल निर्णय घेत नव्हते. यानंतर पंतप्रधान मोदी यांच्या विनंतीनंतर आणि राज्यपालांच्या शिफारशीनंतर निवडणूक आयोगाने 21 मे रोजी होणाऱ्या महाराष्ट्र विधानपरिषदेच्या 9 रिक्त जागांसाठी निवडणुका घेण्याचा निर्णय घेतला.

विधानसभेचे सदस्य विधान परिषदेच्या 9 जागांसाठी मतदान करतात. अशा परिस्थितीत सध्याच्या विधानसभेच्या संख्येनुसार चार जागा भाजपाच्या खात्यात तर 5 जागा कॉंग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना खात्यात जाऊ शकतात. कॉंग्रेस-राष्ट्रवादी-शिवसेना या तीन पक्षांनी प्रत्येकी दोन उमेदवार उभे करण्याचा विचार केला होता. परंतु अशा परिस्थितीत मतदान आवश्यक होते आणि उद्धव यांना क्रॉस वोटिंगमध्ये हरवण्याचा धोका होता. त्यानंतर उद्धव यांच्या विनंतीवरून कॉंग्रेसने आपला एक उमेदवार मागे घेतला आणि उद्धव यांचा मार्ग सुकर झाला.

भाजपने गोपीचंद पडळकर, प्रवीण दटके, डॉ.अजित गोपचडे, रणजितसिंग, मोहिते पाटील यांना उमेदवारी दिली. देवेंद्र फडणवीस यांचे विरोधी मानले जाणारे भाजपचे तीन नेते व ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, विनोद तावडे आणि पंकजा मुंडे यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आलेली नाही. दरम्यान माजी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या शब्दाला अजूनही पक्षात मान आहे आणि केंद्रीय नेतृत्वही त्यांचे ऐकते.

आता नामनिर्देशन छाननी 12 मे रोजी होईल आणि 14 मे रोजी माघार घेण्याची शेवटची तारीख आहे. म्हणजेच 21 मे रोजी मतदानाचा दिवस फक्त औपचारिकता झाला आहे, त्यामुळे उद्धव ठाकरे आता शांततेत श्वास घेऊ शकतात.