उदगीर तालुका पत्रकार संघाचे मराठवाडा स्तरीय पत्रकारिता पुरस्कार जाहीर

पत्रकार शेख रिजवान शोधपत्रकार पुरस्काराने सन्मानित

उदगीर : पोलीसनामा ऑनलाइन – उदगीर तालुका पत्रकार संघाच्या वतीने अयोजित मराठवाडास्तरीय पत्रकारिता पुरस्कार सन २॰१९ चे निकाल ५ जानेवारी रोजी संघाचे अध्यक्ष राम मोतीपवळे व सचिव दयानंद बिरादार यांनी जाहीर केले. उदगीर तालुका पत्रकार संघाच्यावतीने गत दहा वर्षापासून मराठवाडास्तरीय उत्कृष्ट वार्ता व शोध वार्ता या दोन गटात पुरस्कार दिले जितात.

या वर्षी जाहीर झालेल्या पुरस्कारात शोध वार्ता गट प्रथम पुरस्कार वाई बाजार तालुका माहूर जिल्हा नांदेड येथील दैनिक सकाळचे बातमीदार खान साजीद मजीद यांच्या ‘गायरान जमिनीतून मुरुमाची लूट’ या बातमीस अर्जुन मुद्दा यांच्यावतीने कै. महादप्पा मुद्दा यांच्या स्मरणार्थ ५ हजार रुपये रोख रक्कम सन्मान चिन्ह प्रमाणपत्र, व्दितीय पुरस्कार बिड येथील बिड रिपोर्टर चे प्रतिनिधी शेख रिजवान शेख खलिल यांच्या ‘कोडीन स्ट्राईक ‘या बातमीस स्वामी विवेकानंद महाविद्यालय वृत्तपत्र विद्या विभागाच्या वतीने ३ हजार रुपये रोख ,सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र , तृतीय पुरस्कार दैनिक लोकमत चे अहमदपूर प्रतिनिधी विश्वंभर स्वामी यांच्या ‘मराठी माध्यमाच्या शाळांचा पट घसरला ‘ या बातमीस पत्रकार दयानंद बिरादार यांच्यावतीने कै. नागनाथराव बिरादार यांच्या स्मरणार्थ २हजार रुपये ,सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

उत्कृष्ट वार्ता गट
प्रथम पुरस्कार दैनिक पुण्यनगरीचे तेर जिल्हा उस्मानाबादचे प्रतिनिधी हरी खोटे यांच्या ‘शासकीय मदती विना नुकसानग्रस्त शेतकर्‍यांनी धरली चाढ्यावर मुठ !’ या बातमीस अर्जून मुद्दा यांच्यावतीने जेष्ठ पत्रकार कै. महादप्पा मुद्दा यांच्या स्मरणार्थ ५ हजार रोख सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र , व्दितीय पुरस्कार दैनिक आनंद नगरीचे औसा जि ,लातूर येथील प्रतिनीधी विठ्ठल पांचाळ यांच्या ‘ माकणी धरण उशाला,कोरड औसेकरांच्या घशाला ‘ या बातमीस स्वामी विवेकानंद महाविद्यालय वृत्तपत्र विद्या विभाग यांच्यावतीने रोख ३ हजार रुपये रोख, सन्मान चिन्ह, तृतीय पुरस्कार दैनिक आदर्श गावकरीचे उदगीर जि.लातूर येथील प्रतिनिधी बिभिषण मद्देवाड यांच्या ‘दु:ख वेदना, अश्रुंना आधार देणारा ‘शुभ’ विवाह’ या बातमीस जेष्ठ पत्रकार अनंत अपसिंगेकर यांच्यावतीने कै.लक्ष्मीबाई अपसिंगेकर यांच्या स्मरणार्थ रोख २हजार रुपये रोख सन्मानचिन्ह व प्रमाण पत्र देऊन गौरवण्यात येणार आहे.

परिक्षक म्हणून प्रा. डाॅ राजकुमार मस्के, शिवकुमार डोईजोडे व प्रा. प्रविण जाहुरे यांनी काम पाहिले. लवकरच एका कार्यक्रमात सन २०१८ व २०१९ या दोन्ही ही वर्षीचे पुरस्कार दिले जाणार असल्याची माहिती संघाचे अध्यक्ष राम मोतीपवळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/