हिंदू महासभेची ‘घोषणा’ ! उध्दव ठाकरेंना अयोध्येत येण्याचा ‘नैतिक’ अधिकार नाही, पाऊल ठेवलं तर…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अखिल भारत हिंदू महासभेने शिवसेना प्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आयोध्येत येण्यास विरोध केला आहे. महासभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष रवींद्र कुमार द्विवेदी यांनी सांगितले की पहिल्यांदा मंदिर आणि नंतर सरकारचा नारा देणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी श्रीरामाचे अस्तित्व नाकारण्याचे प्रतिज्ञापत्र सर्वोच्च न्यायालयात देणाऱ्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत महाराष्ट्रात सरकार स्थापन केल्यानंतर आता त्यांना अयोध्येत येण्याचा नैतिक अधिकारी नाही, त्यांनी तो गमावला आहे.

ते म्हणाले की उद्धव ठाकरेंनी श्रीराम जन्मभूमीवर पाऊल ठेवले तर हिंदू महासभा श्रीरामजन्मभूमीला गंगा आणि शरयूचे जल शिंपडून पुन्हा पवित्रा करु. हिंदू महासभेचे अध्यक्ष राकेश दत्त मिश्र म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी श्रीराम कारसेवकांवर गोळी चालवणाऱ्या समाजवादी पार्टीच्या महाराष्ट्रातील अध्यक्षाला सोबत घेऊन हे सिद्ध केले की शिवसेना श्रीराम विरोध्यांच्या सोबत आहेत. अशा श्रीराम विरोधी उद्धव ठाकरेंना हिंदू महासभा अयोध्येच्या पवित्र भूमीवर पाय ठेवू देणार नाही त्यांना परत लावून देण्यासाठी प्रयत्न करु.

हिंदू महासभेचे उत्तर भारत प्रभारी महंत परशुराम दासजी म्हणाले की उद्धव ठाकरे यांनी श्रीराम विरोधी राजकीय पक्षांशी सत्तेच्या लालसेपोटी हात मिळवून ना की फक्त हिंदूचा विश्वास गमावला आहे तर बाळासाहेब ठाकरेंच्या हिंदुत्वाला धूळीत मिळवले आहे.

अयोध्येचे महंत करपात्री जी महाराज यांनी हिंदू महासभेचे समर्थन करत सांगितले की अयोध्येचे साधू संत या अभियानात हिंदू महासभेसोबत आहे आणि हिंदू महासभेला आव्हान देत उद्धव ठाकरे विरोधात रस्त्यावर उतरण्यास तयार आहेत.