विराट अनुष्काचा कुत्रा ! नेटकऱ्यांकडून टीकेचा भडिमार

पोलीसनामा ऑनलाइन – भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) सध्या चांगलाच चर्चेत आहे. टीम इंडियासोबत ऑस्ट्रेलियात असलेल्या कोहलीने सिडनीतून भारतीय चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. या शुभेच्छा देत असताना विराट कोहलीने फटाके न फोडण्याचे (Cracker Free Diwali) आवाहन केले आहे. सोशल मीडियावर विराटचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर काही नेटकऱ्यांनी त्याच्यावर टीका करायला सुरुवात केली.

काही नेटकऱ्यांनी आपली पातळी सोडत याप्रकरणी विराटची पत्नी अनुष्का शर्मावरही अश्लील टीका केली आहे. रविवारी काही नेटकऱ्यांनी ट्विटरवर #अनुष्का_तेरा_कुत्ता_संभाल असा हॅशटॅगही ट्रेंड केला. विराट आणि अनुष्कावर चहुबाजूंनी टीकेचा भडिमार होत असताना माजी खासदार आणि काँग्रेसचे सध्याचे प्रवक्ते डॉ. उदीत राज (Congress Leader Udit Raj ) यांनी विराटची बाजू घेतली आहे. मात्र, विराटची बाजू घेत असताना उदीत राज यांनीही त्याची तुलना थेट अनुष्काचा कुत्रा म्हणून केली आहे. आयपीएलचा तेरावा हंगाम संपुष्टात आल्यानंतर विराटच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर रवाना झाली आहे. 27 नोव्हेंबरपासून या दौऱ्याला सुरुवात होणार असून, दोन्ही संघ या मालिकेत 3 वन-डे, 3 टी-20 आणि 4 कसोटी सामने खेळणार आहेत. पहिला कसोटी सामना संपल्यानंतर विराट कोहली अनुष्काची बाळंतपणात काळजी घेण्यासाठी भारतात परत येणार आहे.