परळीतील सभेत उदयनराजेंनी ‘कॉलर’ उडवत केला ‘हा’ गौप्यस्फोट

बीड : (परळी) पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात उरली सुरली राष्ट्रवादी- काँग्रेस जरी एवटून परळीत आली तरी पंकजा मुंडेंच्या कमळाला कोणी अडवू शकणार नाही. एक भाऊ गेला तर काय झाले हा भाऊ तुमच्या सोबत आहे, असे म्हणत सभेत कॉलर उडवत एक बार मैने कमिटमेंट की तो मैं अपने आप की भी नही सूनता, असे म्हणत उदयनराजे यांनी याद राखा गाठ माझ्याशी आहे, असा इशारा विरोधकांना दिला. परळी येथील गणेशपार भागात पंकजा मुंडे यांच्या प्रचारार्थ उदयनराजे भोसले यांच्या सभेचे आयोजन केले होते.
पुढे बोलताना उदयनराजे भोसले म्हणाले, कॉलर उडवत एक भाऊ निघून गेला तर काय झालं, हा भाऊ तुमच्यासोबत आहे, असा विश्वास पंकजा मुंडे यांना देत उदयनराजे भोसले यांनी धनंजय मुंडे यांच्यावर टीकेची तोफ डागली. मी कुणाचा विश्वासघात केला नाही तर त्यांनीच माझा विश्वासघात केल्याचा गौप्यस्फोट उदयनराजे भोसले यांनी केला आहे. यावेळी पंकजा मुंडे, खासदार प्रितम मुंडे, महादेव जानकर उपस्थित होते.

धनंजय मुंडे यांच्यावर टीका करताना उदयनराजे म्हणाले, मी कोणाचा विश्वासघात केला नाही तर त्यांनी माझाच विश्वास मोडला. धनंजय मुंडे यांचे नाव न घेता स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या अडचणी सोडवून देखील कोणी विश्वासघात केला ? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. यावेळी पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांनी स्ट्रँग रुप आणि मतमोजणी केंद्राभोवती जॅमर बसवण्याची मागणी केली त्याला प्रत्युत्तर दिले. स्ट्रँगरुम आणि मतमोजणी केंद्राभोवती नव्हे तर त्यांच्या तोंडाला जॅमर बसवा असा निशाणा धनंजय मुंडे यांच्यावर साधला.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा… आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध, अशी घ्या काळजी