सातारच्या राजेंना आठवलेंची ऑफर; उदयनराजेंनी आरपीआयच्या तिकिटावर लढावे

ठाणे : पोलीसनामा ऑनलाईन

जर उदयनराजेंना सातारमधून राष्ट्रवादीने तिकीट नाकारले तर त्यांनी आमच्या पक्षाकडून निवडणूक लढवावी, अशी खुली ऑफर रामदास आठवले यांनी उदयनराजेंना दिली आहे. ते ठाण्यात पत्रकारांशी बोलत होते. शनिवारी उदयनराजे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीचे वृत्त प्रसारित झाल्यानंतर विविध राजकीय चर्चांना सुरूवात झाली होती. उदयनराजेंनी या भेटीचा तपशील सांगितल्यानंतर शरद पवार यांनीही त्यावर खुलासा केला होता. याच पार्श्वभूमीवर आठवले यांनी उदयनराजेंना खुली ऑफर दिली आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’1c956119-bee5-11e8-846e-679c14144da0′]

उदयनराजे यांना उमेदवारीची ऑफर दिल्यानंतर रामदास आठवले यांनी काँग्रेसकडून मोदी सरकारवर करण्यात येत असलेल्या विविध आरोपांबाबतही आपले मत व्यक्त केले. विशेषत: राफेल घोटाळ्यासंबंधी काँग्रेसने केलेल्या आरोपींविषयी त्यांनी प्रतिक्रिया दिली. आठवले म्हणाले, राफेल लढाऊ विमान करार खरेदीत कुठलाही गैरव्यवहार झालेला नाही. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी मोदींवर चुकीचे आरोप करत आहे. अंबानींचा फायदा करण्याचा मोदींचा हेतू आहे, हे चुकीचे आहे. पाकिस्तानची जिरवण्यासाठी हा करार भारताने केला आहे, असा दावा त्यांनी केला. हा करार युपीए काळातच झाला होता. राहुल गांधी यांनी राफेलवर टिका करू नये, असा सल्ला त्यांनी दिला. इंधनाच्या वाढत्या दराबद्दल केंद्र सरकार सोबत चर्चा सुरू असल्याचेही ते म्हणाले. तर आगामी निवडणुकांबाबत बोलताना ते म्हणाले, शिवसेनेने स्वबळावर निवडणुक लढवू नये.

पाकिस्तान लष्कराकडून पुन्हा युद्धाची धमकी