Udyogini Pride Award | जागतिक महिला दिनी कर्तृत्ववान महिलांचा उद्योगिनी प्राईड अवार्डने सन्मान

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Udyogini Pride Award | जागतिक महिला दिनाचे (International Women’s Day) औचित्य साधून उद्योगिनी महिलांनी महिलांसाठी सुरू केलेला उद्योगिनी समूहाने उद्योगिनी प्राईड अवार्ड सोहळा नुकताच पार पडला. उद्योगिनी समोहाच्या संचालिका पल्लवी वागस्कर यांनी या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले होते. कार्यक्रमाची सुरवात दीपप्रज्वलन करून करण्यात आली. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मा. आमदार मेधा कुलकर्णी (Medha Kulkarni), संतोष कराळे (Santosh Karale), बाळासाहेब अमराळे (Balasaheb Amrale), डॉ. इशा नानल (Dr. Isha Nanal), सृष्टी अंभीरराज, धवल आपटे, मनीष घुले आदी मान्यवर उपस्थित होते. पुरस्काराचे स्वरूप सन्मानचिन्ह तुळशीचे रोप, मेडल असे होते. (Udyogini Pride Award)

या प्रसंगी मेधा कुलकर्णी बोलताना म्हणाल्या की आज देशभरातील उल्लेखनीय कामगिरी केलेल्या निवडक २० महिलांना पुरस्कार माझ्या हस्ते देताना मला अभिमान वाटतोय. उद्योग क्षेत्रात महिलांचा वाढता सहभाग कौतुकास्पद आहे. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आदिशक्तीचे रूप असलेल्या कर्तृत्ववान महिलांचा सन्मान म्हणजे संपूर्ण स्त्री वर्गाला प्रेरणा देणार आहे. (Udyogini Pride Award)

पल्लवी वागस्कर म्हणाल्या की उद्योगिनी समूह हा संपूर्ण देशात तसेच ऑस्ट्रेलिया, कॅनडा या ठिकाणी कार्यरत आहे. यामध्ये २५ हजार महिलांचा समावेश आहे. यामध्ये महिलांना व्यवसाविषयी मार्गदर्शन आणि सहकार्य केले जाते. तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्चना कदम यांनी केले.

भावना दौंड, रजनी दरेकर, डॉ. कीर्ती कुलकर्णी ,सुनिता गाजरे ,किरण प्रभुणे ,शुभांगी कराळे ,
शितल, रूपाली, पल्लवी कांबळे, काजल गुरव, सुहानी पवार ,काया नायर, श्रद्धा व धनश्री अमराळे ,
अंजली लोटके ,ईश्वरी होले, चित्रा जठार, उत्तरा चौधरी, सोनाली तुपे ,मीनाक्षी ओझा, पूजा सावंत,
स्मिता बाणे यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर सोनाली झांबरे,
छाया पांचाळ, अरुंधती पवार, मनीषा राऊत, हेमा लाळगे, आरती वाघे हे उपस्थित होते.
तसेच गीतांची मैफिल यावेळी पार पडली. स्नेहल राक्षे व श्रेया गाजरे यांनी कार्यक्रम बहारदार नृत्ये केली.

Advt.

Web Title : Udyogini Pride Award | On International Women’s Day, women of achievement are honored with the Udyogini Pride Award

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Kolhapur ACB Trap | स्थायित्व प्रमाणपत्र दिल्याचे मोबदल्यात लाचेची मागणी, सी.पी.आर. हॉस्पिटलमधील वरिष्ठ लिपिक अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

Mumbai Crime News | होळी खेळून घरी गेलेल्या दिपक शाह आणि टिना शाह यांचा मृत्यू; कारण अद्याप अस्पष्ट, मुंबईतील घाटकोपरमधील घटना

Manoramabai Ganeshpure Passes Away | अभिनेते भारत गणेशपुरे यांच्या मातोश्रींचे निधन; मरणोत्‍तर नेत्रदानाचा घेतला निर्णय