‘इमामा’नं धुमधडाक्यात केलं ‘लग्न’, 2 आठवड्यांनी समजलं बायको पुरुष आहे, पायाखालची जमीनच सरकली

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – युगांडामधील एका इमामाच्या बाबतीत धक्कादायक प्रकार घडल्याचं समोर आलं आहे. मुलगी समजून जिच्यासोबत त्यानं लग्न केलं ती पुरुष असल्याचा धक्कादायक खुलासा झाला आहे. पारंपरिक पद्धतीने एका इमामानं म्हणजेच धर्मगुरूने निकाह केला होता. मोहम्मद मुटुंबा असं त्यांचं नाव आहे. परंतु नंतर त्यांना धक्काच बसला. कारण त्यांची पत्नी पुरुष असल्याचं वास्तव लग्नानंतर समोर आलं.

मोहम्मद आणि त्यांच्या पत्नीमध्ये लग्नाला दोन आठवडे होऊनही शरीरसंबंध प्रस्थापित झाले नव्हते. मासिक पाळीचे कारण देऊन त्यांच्या पत्नीनं शरीरसंबंध टाळले. एका इंग्रजी वृत्तपत्रानं याबाबत वृत्त दिलं आहे.

असा झाला वधू पुरुष असल्याचा खुलाासा

वधू ही पुरुष आहे याचा खुद्द इमामानंच नाही तर त्याच्या शेजाऱ्यानं खुलासा केला आहे. शेजाऱ्याने तिच्यावर आरोप केला की, आपल्या घरातील वस्तू चोरण्यासाठी तिने भिंतीवरून उडी मारली. यासाठी त्यानं पोलिसांत तक्रारही केली. यानंतर सगळा प्रकार समोर आला. इमाम असणाऱ्या मोहम्मद यांना तर हे कळल्यानंतर त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली.

इमाम आणि त्याच्या पत्नीला पोलिसांनी बोलावल्यानंतर त्याची पत्नी पारंपरिक मुस्लिम वेशभुषेत आली. महिला पोलिसांनी जेव्हा इमामाच्या पत्नीची तपासणी केली तेव्हा ते चक्रावून गेले. कारण इमामाची पत्नी पुरुष असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं. पैशांसाठी आणि घरातील वस्तू चोरण्यासाठी हा खटाटोप केल्याचं आरोपीनं पोलिसांना सांगितलं.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/