UGC आणणार परीक्षांसंबंधी नवीन नियमावली

पोलीसनामा ऑनलाईन टीम : विद्यापीठ अनुदान आयोग (युसीजी) कोरोना संसर्गाच्या वाढत्या प्रभावा दरम्यान परीक्षा कशी घ्यावी यासंदर्भात नवी मार्गदर्शक तत्वे जारी करणार आहे. तसेच युसीजी यावरती काम करत असून, याबाबत नवीन माहिती सुद्धा देण्यात आली आहे. दरम्यान, युसीजीने यापूर्वी कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवरती महाविद्यालयीन परीक्षा आणि इतर परीक्षा कशा आयोजित करण्यात याव्यात यासंबंधी मार्गदर्शक तत्वे जारी केली होती.

पण बदलत्या वातावरणाच्या अनुषंगाने किंवा परिस्थिती सामान्य होत नसल्याने आयोगाने त्यात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. मोठ्या शिक्षक संस्थांनी विद्यार्थी जास्त असल्याचे सांगत परीक्षा घेण्यास असमर्थता दर्शवली होती. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचे अध्यक्ष अनिल सहस्त्रबुद्धे यांनी सांगितलं की, ‘विविध राज्यांमध्ये कोविड-१९ च्या संदर्भात परिस्थिती लक्षात घेता युसीजी काही काळापूर्वी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये बदल करत आहे.’

पुढं बोलताना शहस्त्रबुद्धे यांनी म्हटलं की, युसीजी, एआयसीटीई, बार कौन्सिल ऑफ इंडिया, आर्किटेक्चर कौन्सिल, फार्मसी कौन्सिलने देशातील अन्य उच्च संस्था देखील यात सहभागी होतील. हे सर्व देशातील परिस्थितीचा आढावा घेतील आणि परीक्षांसाठी नवीन मार्गदर्शक सूचना तयार करतील. तसेच मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया, डेंटल कौन्सिल ऑफ इंडिया, आर्किटेक्चर कौन्सिल, बार कौन्सिल ऑफ आज्ञा या संस्थाना आपल्या संबंधित कॉलेजांमार्फत ऑनलाइन परीक्षा आणि प्रोजेक्ट्स घेण्यास सांगितलं आहे. काही शैक्षणिक परिषदांनी स्पष्ट सांगितलं की, परीक्षा न घेता पदवी दिल्यास संबंधित कायद्याचे उल्लंघन होणार आहे.