आता पोस्ट ग्रॅज्युएशनच्या समांतर असेल CA, CS आणि ICWA ची डिग्री, UGC ने दिली मान्यता

नवी दिल्ली : अलिकडेच युजीसीने एक असा निर्णय घेतला आहे, जो ऐकून चार्टर्ड अकाऊंटन्सीच्या विद्यार्थ्यांचा आनंद दुप्पट होईल. याचे कारण CA, CS आणि ICWA ची डिग्री आता पोस्ट ग्रॅज्युएशनच्या समान असणार आहे. यूजीसीने प्रामुख्याने हा निर्णय इन्स्टीट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंट्न्स ऑफ इंडिया आणि त्याच्याशी संबंधीत दुसर्‍या संस्थांच्या विनंतीनुसार घेतला आहे. यावरून आयसीएआयने म्हटले की, या निर्णयाने सीएच्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण मिळवण्यात मदत होईल. तसेच ते सहजपणे जागतिक स्तरावर सुद्धा पोहचू शकतील.

आयसीएआयचे सीसीएम धीरज खंडेलवाल यांनी आपल्या ट्विटमध्ये सांगितले की, युजीसीने सीए, सीएस आणि आयसीडब्ल्यूएचे क्वालिफिकेशन्स पोस्ट ग्रॅज्युएट डिग्रीची मान्यता दिली आहे. ही अकाऊंटन्सी व्यवसायाशी संबंधीत असंख्य लोकांसाठी मोठी संधी आहे. आयसीएआय एक संविधानिक संस्था आहे. ती अ‍ॅक्ट ऑफ पार्लेमेंट -द चार्टर्ड अकाऊंटन्टस अ‍ॅक्ट 1949 च्या अंतर्गत स्थापन करण्यात आली होती. अलिकडेच संस्थेचे 3 लाखपेक्षा जास्त सदस्य झाले आहेत. यामध्ये कुणीही विद्यार्थी 12वी पास झाल्यानंतर आयसीएआय प्रवेश परीक्षेद्वारे सीए फाऊंडेशन कोर्समध्ये अ‍ॅडमिशन घेऊ शकतो.

सीएस फाऊंडेशन कोर्सची जूनमध्ये होईल परीक्षा
इंन्स्टीट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटन्स्ट ऑफ इंडिया (आयसीएआय) ने फाऊंडेशन कोर्ससाठी सीए जून परीक्षा-2021 चे शेड्यूल जारी केले आहे. परिक्षेची सविस्तर माहिती विद्यार्थी आयसीएआयच्या संकेतस्थळावर पाहू शकतात. या संकेतस्थळावर जारी झालेल्या नोटिफिकेशननुसार, सीए मे परीक्षा 24, 28 आणि 30 जूनला होईल. याशिवाय सीए इंटरमीजिएट आणि फायनल परीक्षेची डेट शीट सुद्धा जारी झाली आहे. सीए इंटरमिजिएटच्या परीक्षा 22 मे आणि फायनल परीक्षा 21 मेपासू सुरू होतील. याशिवाय ओल्ड स्कीमअंतर्गत ग्रुप-फर्स्टसाठी इंटरमिजिएटची परीक्षा 22, 24, 27 आणि 29 मे रोजी होईल.