शेकडो विद्यार्थी नेट परीक्षेला मुकले ; सरकारचा शिस्तीचा अंकूश

मुंबई  : पोलीसनामा ऑनलाईन – राष्ट्रीय शिक्षण परिषदेच्या माध्यमातून घेतल्या जाणाऱ्या युजीसी नेट परीक्षेच्या परीक्षार्थी विद्यार्थ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागले आहे. परीक्षेच्या वेळेत म्हणजे सकाळी ९ वाजता परीक्षा केंद्रावर हजर नसणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेला बनू नदेण्याचा निर्णय या आधीच शिक्षण परिषदेने जाहीर केला होता. तरी हि या मुलांनी दिलेली वेळ नपाळल्यामुळे त्यांना वेळेचा चांगलाच फटका बसला आहे.

केंद्रीय मानव संसाधन विभागाच्या वतीने मागील काही महिन्यात एक मोठा निर्णय घेण्यात आला होता. युजीसी नेट आणि तशाच दर्जाच्या परीक्षा सीबीएससीने घेण्यास नकार दिला होता.सीबीएससीच्या या पवित्र्यानंतर मानव संसाधन मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिल्लीत महत्वाच्या बैठका घेऊन  राष्ट्रीय शिक्षण परिषदेची स्थापना करण्याचा महत्वचा निर्णय घेतला. त्यानंतर नेट परीक्षेत हि मोठे बदल करण्यात आले नेटचे होणारे तीन पेपर जाऊन आता दोनच पेपर राहिले आहेत. तसेच तत्परतेने निकाल लावण्याच्यासाठी हि परीक्षा ऑनलाईन स्वरूपात घेण्याचा निर्णय राष्ट्रीय शिक्षण परिषदेच्या वतीने घेण्यात आला आहे. या सर्व निर्णय प्रक्रियेतून समोर आलेली हि पहिलीच परीक्षा होती त्या परीक्षेत शिस्तीचे प्रदर्शन करण्यात आले आहे त्यामुळे मुलांचे मोठे नुकसान झाले आहे.

राष्ट्रीय शिक्षण परिषदेच्या नियमानुसार परीक्षा केंद्रावर सकाळी ७.३० ते ९ या वेळेत पोहचणे बंधनकारक आहे. सकाळी ९. ३० ते दुपारी  १ वाजेपर्यंत हि परीक्षा पार पडणार आहे. या परीक्षेसाठी राज्याच्या प्रत्येक शहरात कमी अधिक प्रमाणात असे प्रकार घडल्याचे पाहण्यात मिळाले आहेत . कोल्‍हापूर, पुणे, मुंबईसह राज्यातील सर्वच परीक्षा केंद्रांवर असे उशीला येण्याचे प्रकार घडले आहेत.

परीक्षेची वेळ सकाळी लवकर असल्याने खेड्या पाड्यातून शहरात परीक्षा देण्यासाठी  येणाऱ्या मुलांना टाइम मॅनेजमेंट करता येत नसल्याचे एका परीक्षार्थी विद्यार्थाने माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले आहे.ज्या ठिकाणी परीक्षा केंद्र नेमण्यात आलेली असतात त्याठिकाणी परीक्षार्थी विद्यार्थी पूर्वी कधीच गेलेले नसतात म्हणून त्यांना तेथे पोचण्यासाठी त्यांना अडचणी येतात परिणामी त्यांना परीक्षा केंद्रावर पोहचण्यास उशीर होतो आहे.