UGC । पोस्ट ग्रॅज्युएट तरुणांना नोकरीची सुवर्णसंधी ! UGC मध्ये ज्युनियर कन्सल्टंट पदांवर भरती, पगार 50 ते 60 हजार रुपये

नवी दिल्ली : वृत्तसंस्था (Policenama online) – कोणत्याही शाखेच्या पदव्युत्तर पदवी झालेल्या तरुणांना नोकरीची सुवर्ण संधी आहे. विद्यापीठ अनुदान आयोगामध्ये म्हणजेच (UGC) ज्युनियर कन्सल्टंट (Junior Consultant) या पदावर काम करण्याची संधी उपलब्ध आहे. विद्यापीठ अनुदान आयोगामध्ये (University Grant Commission) ज्युनियर कन्सल्टंट (Junior Consultant) म्हणून 8 पदांवर भरती होणार आहे. याबाबत अधिसूचना विद्यापीठ अनुदान (University Grant Commission) आयोगातर्फे प्रसिद्ध करण्यात आलीय. या पदावरची भरती केवळ 6 महिन्यांकरिता कंत्राटी तत्त्वावर (Contract Basis) केली जाणार आहे. संबंधित उमेदवाराची कामाची पद्धत, आवाका आणि एकंदर वर्तन यानुसार हे काँट्रॅक्ट 6 महिन्यांनंतर पुढे वाढवलं जाऊ शकतं, असं ‘UGC कडून सांगण्यात आलं आहे.

पदे –
ज्युनियर कन्सल्टंट (Junior Consultant) – 8

 

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) –

मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेच्या पदव्युत्तर पदवीमध्ये (Postgraduate degree) किमान 55 टक्के गुण आणि कम्प्युटर, एमएस ऑफिस, इंटरनेट (Computer, MS Office, Internet) आदींवर काम करण्याचं ज्ञान आवश्यक.

वयाची अट –
वय 21 ते 35, आरक्षित वर्गांतल्या युवकांना सरकारच्या नियमानुसार वयात सवलत दिली जाणार आहे.

वेतन –
मासिक 50 ते 60 हजार रुपये

अधिकृत वेबसाइट – ugc.ac.in

अधिसूचना लिंक –
https://www.ugc.ac.in/pdfnews/6247724_Junior_Consultants_on_Contract_Basis_for_DEB.pdf

 

अर्ज करण्याची अंतिम तारीख – 12 जुलै 2021 ऑनलाईनद्वारे

या दरम्यान, निवडल्या गेलेल्या उमेदवारांना डिस्टन्स एज्युकेशन ब्यूरोमध्ये (Distance Education Bureau) ज्युनियर कन्सल्टंट म्हणून काम करायचं आहे. संबंधितांना डिस्टन्स एज्युकेशन, ऑनलाइन एज्युकेशन (Online Education) या विषयांसंदर्भात ज्ञान हवं. या उमेदवारांना महिन्याला 50 ते 60 हजार रुपये कन्सल्टन्सी फीच्या रूपात दिले जातील. या पदाकरिता ऑनलाइन अर्ज करण्यासाठी https://www.ugc.ac.in/hrrecruit/ या लिंकवर जाऊन उमेदवारांनी आपली नोंदणी करणं अत्यावश्यक असल्याचं सांगितलं आहे.

Web Title :- ugc recruitment 2021 for the posts of junior consultanats

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

नगरमध्ये महापौर, उपमहापौर निवडीपूर्वीच शिवसेनेत ‘राडा’ ! दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी

भारत बायोटेकला मोठा ‘झटका’ ! भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे ब्राझिलने केला ‘कोव्हॅक्सिन’चा 324 मिलियन डॉलरचा करार रद्द

Pune Crime News | बुधवार पेठेतील ‘त्या’ महिलेच्या खुनाचा पर्दाफाश; सत्य आलं समोर

Corona side effects | कोरोना संसर्गाचा आणखी एक साईड इफेक्ट ! आता शौचातून ब्लिडिंगची 5 प्रकरणे आली समोर, एकाचा मृत्यू