Homeताज्या बातम्याUGC Scholarship 2021 | विद्यार्थ्यांनी भरावा यूजीसी शिष्यवृत्ती योजनेचा अर्ज, मिळतील 7,800...

UGC Scholarship 2021 | विद्यार्थ्यांनी भरावा यूजीसी शिष्यवृत्ती योजनेचा अर्ज, मिळतील 7,800 Rs प्रति महिना; जाणून घ्या

नवी दिल्ली : UGC Scholarship 2021 | यूनिव्हर्सिटी ग्रँट कमिशनने PG कोर्स करणार्‍या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजनेचे अर्ज सुरू करण्याची घोषणा केली आहे. या अंतर्गत प्रोफेशनल पीजी कोर्स करणार्‍या विद्यार्थ्यांना दरमहिना 4500 रुपये आणि 7,800 रुपये मिळतील. शिष्यवृत्ती योजनेसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार तारखेपूर्वी अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकतात. (UGC Scholarship 2021)

* कुणाला मिळेल शिष्यवृत्ती

टेक्निकल, इंजिनियरिंग, व्यवस्थापन, फार्मसी आणि इतर बिझनेस एज्युकेशनचे कोर्स करणार्‍या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळेल. ME आणि M Tech विद्यार्थ्यांना दरमहिना 7,800 रुपये दिले जातील. तर इतर पीजी कोर्सेसच्या विद्यार्थ्यांना दरमहिना 4,500 रुपयांची शिष्यवृत्ती मिळेल. SC, ST वर्गाच्या विद्यार्थ्यांना या योजनेंतर्गत लाभ मिळेल. (UGC Scholarship 2021)

* यांना मिळणार नाही शिष्यवृत्ती!

नॉन-प्रोफेशनल कोर्समध्ये सहभागी होणार्‍या विद्यार्थ्यांना या योजनेंतर्गत लाभ मिळणार नाही. मास कम्यूनिकेशन अँड जर्नालिजममध्ये MA, MSc, MCom, MSW सारखे यूजीसी गाईडलाईन्सनुसार नॉन-प्रोफेशनल कोर्सचा भाग आहेत.

हे कोर्स करणार्‍या विद्यार्थ्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही. डिस्टन्स एज्युकेशन घेणारे विद्यार्थी सुद्धा यासाठी पात्र नाहीत. दोन किंवा तीन वर्षाचा पीजी कोर्स करणार्‍या विद्यार्थ्यांनाच या योजनेचा लाभ मिळेल.

* केव्हा मिळेल शिष्यवृत्ती

UGC द्वारे शिष्यवृत्तीची रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या खात्यात टाकली जाईल. मात्र, पुढील वर्गात अ‍ॅडमिशन न झाल्यास विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती रोखली जाईल. (UGC Scholarship 2021)

* येथे करा अर्ज (UGC Scholarship 2021 How To Apply)

1 : शिष्यवृत्तीची अधिकृत वेबसाइट scholarship.gov.in वर जा.

2 : होमपेजवर ’UGC/AICTE’ योजनेवर क्लिक करा.

3 : प्रोफेशनल कोर्स करणार्‍या SC/ST विद्यार्थ्यांसाठी PG स्कॉलरशिपसाठी लिंकवर क्लिक करा.

4 : माहिती वाचून न्यू रजिस्ट्रेशन वर क्लिक करा. पूर्ण माहिती भरा.

5 : शिष्यवृत्ती निवडून ऑनलाइन अर्ज करा.

* आवश्यक कागदपत्र

– बँक पासबुक

– आधार कार्ड नंबर

– सरकारी आयडी कार्ड

– मुळ रहिवाशी दाखला

 

* अंतिम तारखेपूर्वी भरा अर्ज

शिष्यवृत्ती योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना 15 डिसेंबर 2021 पूर्वी ऑफिशियल वेबसाइटच्या माध्यमातून अप्लाय करा. अर्ज प्रक्रिया 30 नोव्हेंबर 2021 पासून सुरू करण्यात आली आहे. अर्ज भरल्यानंतर विद्यार्थ्यांना तो आपली युनिव्हर्सिटी किंवा कॉलेजमधून व्हेरिफाय करावा लागेल. योजनेंतर्गत 1000 विद्यार्थ्यांना योजनेचा लाभ मिळेल.

Web Title : UGC Scholarship 2021 | ugc scholarship 2021 follow these steps to apply students to get benefit of 7800 rupees per month

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

MLA Chandrakant Jadhav | कोल्हापूर उत्तरचे काँग्रेसचे विद्यमान आमदार चंद्रकांत जाधव यांचे निधन

GST on Notice Period | आता नोकरीला ‘रामराम’ करणे देखील महागात पडणार,
नोटीस पिरियडसाठी भरावा लागेल GST

Pune Crime | आरोग्य विभाग भरती पेपर फुटी प्रकरणी पुणे सायबर पोलिसांकडून एकाला औरंगाबादमधून अटक

Maharashtra Rains | पुण्यासह राज्यात अनेक ठिकाणी विक्रमी पाऊस; जाणून घ्या कोठे किती झाला पाऊस

Central Bank of India Recruitment 2021 | नोकरीची सुवर्णसंधी ! सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये 115 जागांसाठी भरती; पगार 1 लाख रूपयांपर्यंत रुपये 

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News