‘या’ 3 सुविधांचा फायदा घेण्यासाठी ‘आधार’कार्डशी मोबाईल नंबर लिंक करणं आवश्यक, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था : आधार कार्डशी जर तुमचा मोबाईल नंबर जोडलेला असेल तर सोप्या पद्धतीने इन्कम टॅक्स फाईल करता येते. त्याचप्रमाणे सरकारी योजनांचा फायदाही सहज मिळवता येतो. आधारच्या माहितीमध्ये नाव, जन्म तारीख आणि पत्ता गरजेचा असतो. नंबर जर रजिस्टर नसेल तर काही सुविधांचा फायदा घेता येत नाही.

जाणून घ्या का गरचेचे आहे आधारला मोबाईल नंबर सोबत रजिस्टर करणे

1) आधार सोबत मोबाईल नंबर जोडलेला नसेल तर अनेक ऑनलाइन सर्व्हिसचा फायदा मिळवता येत नाही कारण अशा सुविधांचा फायदा घेण्यासाठी रजिस्टर मोबाईल नंबरवर OTP पाठवला जातो.

2) मोबाईल रजिस्टर नसेल तर आधार वरील माहिती अपडेट करता येत नाही.

3) ज्या ज्या सुविधांमध्ये आधार ऑथेंटिकेशन जसे की ITR वेरिफिकेशन गरज असते त्या सुविधांचा फायदा घेता येऊ शकत नाही.

4) एम आधाराला मोबाईल आधार म्हणतात जे की, आपल्या फोनमध्ये असते. या सुविधेचा फायदा घेण्यासाठी सुद्धा आधार मोबाईलला जोडलेले असणे गरजेचे आहे.

अशा प्रकारे करू शकता आधाराला मोबाईल नंबर रजिस्टर
आपल्या जवळील कोणत्याही आधार सेंटरवर जाऊन ऑनलाइन पद्धतीने आधारला मोबाईल नंबर रजिस्टर करू शकता यासाठी 50 रुपये शुल्क आकारला जाईल.

आईवीआरएसच्या माध्यमातून तुम्ही आपला मोबाईल क्रमांक आधाराला लिंक करू शकता. यासाठी यूआईडीएआई ने 14546 टोल फ्री क्रमानं सुरु केला आहे. यावर कॉल करून सहजरित्या आपला नंबर आधाराला कनेक्ट करता येतो.

दिलेल्या टोल फ्री नंबरवर कॉल केल्यावर ते विचारतील ती माहिती सांगितल्यावर आपल्या मोबाईल वर एक OTP येईल तो एंटर केला की मोबाईल नंबर रजिस्टर होईल.

माहिती देताना योग्य माहिती देणे गरजेचे आहे अचूक माहिती व्हेरिफाय झाल्यानंतरच आधारशी नंबर लिंक होईल. सुविधांचा लाभ घेण्यासाठी आपल्याला मोबाइलला नंबर आधार कार्डशी लिंक करणे गरजेचे आहे.