Uidai/Aadhar Card : आधारकार्ड हरवलंय तर ‘नो-टेन्शन’, जाणून घ्या पुन्हा कसं मिळवायचं आपलं Aadhaar

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आजच्या काळात आधार कार्ड सर्वात महत्वपूर्ण कागदपत्रांपैकी एक आहे. त्याशिवाय तुमची बहुतेक काम अपूर्ण राहतात. तुमच्याकडे सर्वत्र आधार कार्ड मागितले जाते. अशा परिस्थितीत तुमचे आधार कार्ड हरवल्यास नक्कीच तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागू शकतो. तसेच तुमचा फोन नंबर नोंदणीकृत नसेल, तर तुम्हाला बर्‍याच अडचणींचा सामना करावा लागू शकतो. परंतु अशा परिस्थितीत तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही, कारण ऑनलाइन प्रक्रियेद्वारे तुम्ही तुमचे आधार कार्ड पुन्हा मिळवू शकता.

यासाठी तुम्हाला प्रथम आधारच्या अधिकृत वेबसाइट www.uidai.gov.in वर जावे लागेल. यानंतर तुम्हाला आधार सेवा टॅबवर जाऊन Order Aadhaar Reprint वर क्लिक करावे लागेल. येथे एक नवीन पृष्ठ उघडेल जिथे तुम्हाला १२ अंकी आधार क्रमांक किंवा १६ अंकी व्हर्च्युअल आयडी नंबर सबमिट करण्यास सांगितले जाईल. यानंतर खाली दिलेला कॅप्चा भरून Mobile number is not Registered वर क्लिक करा. आता तुमच्या समोर नवीन मोबाइल नंबर प्रविष्ट करण्याचा पर्याय असेल. नंबर प्रविष्ट करताच तुमच्या फोनवर ओटीपी येईल.

आता हा ओटीपी सबमिट करा आणि नियम व शर्ती वाचल्यावर I Agree वर क्लिक करा. यानंतर पुढील पृष्ठावर तुम्हाला ५० रुपये पेमेंट करण्याचा पर्याय येईल. तुम्ही कोणत्याही प्रकारे पेमेंट करू शकता, पर्याय तुम्हाला पृष्ठावर दिसतील. पेमेंट केल्यानंतर तुम्हाला एक पावती दिली जाईल, जी तुम्हाला डाउनलोड करावी लागेल. आता पुन्हा आधार कार्ड प्रिंट करून तुम्ही दिलेल्या पत्त्यावर UIDAI पाठवेल. तुम्ही येथे प्रविष्ट केलेला मोबाइल नंबर आधारमध्ये नोंदवला जाणार नाही. आधारमध्ये नोंदणी करण्याची प्रक्रिया वेगळी आहे.