सावधान ! ‘या’ प्रकारचे Aadhaar कार्ड नाही ‘वैध’, होऊ शकतं तुमचे मोठं नुकसान, जाणून घ्या

नवी दिल्ली : जर तुम्ही तुमच्या आधार कार्डला दुकानातून लॅमिनेशन केले आहे किंवा ते प्लास्टिक कार्डप्रमाणे तयार करून वापरत असाल, तर सावध व्हा. युआयडीएआयने याबाबत अनेकदा सूचना जारी केली आहे. युआयडीएआयने सूचना केली आहे की, असे केल्याने आधारचा क्यूआर कोड काम करणे बंद करू शकतो, किंवा वैयक्तिक माहिती चोरी होऊ शकते. तुमच्या परवानगीशिवाय तुमची वैयक्तिक माहिती अन्य कुणाकडे तरी पोहचू शकते.

असे होते नुकसान
युआयडीएआयने प्लास्टिक आधार कार्डच्या नुकसानीबाबत एक वक्तव्य जारी केले होते. या वक्तव्यात अथॉरिटीने म्हटले होते की, प्लास्टिक आधार किंवा स्मार्ट आधाकार्डचा वापर करू नये. अशा कार्डने तुमच्या आधार डिटेल्सच्या प्रायव्हसीला धोका निर्माण होऊ शकतो. प्लास्टिक आधार कार्ड अनेकवेळा उपयोगात येत नाही. कारण प्लास्टिक आधारच्या अनऑथराईज्ड प्रिटींगमुळे क्युआर कोड डिस्फंक्शनल होतो. सोबतच आधारमधील पर्सनल डिटेल्स परवानगीशिवाय शेयर होण्याचा धोका आहे.

इतके पैसे करून बनवतात प्लास्टिक आधार
वक्तव्यात असेही म्हटले आहे की, प्लास्टिक किंवा पीव्हीसी शीटवर आधार प्रीटींगसाठी लोकांकडून 50 रुपयांपासून 300 रुपयांपर्यंत वसूल केले जात आहेत. काही ठिकाणी तर यापेक्षा जास्त पैसे घेतले जातात. युआयडीएआयने लोकांना अशा दुकानांपासून किंवा लोकांपासून दूर राहणे आणि त्यांच्याकडून हे काम करून न घेण्याचा सल्ला दिला आहे.

हे आधारसुद्धा आहे वॅलिड
युआयडीएआयने आपल्या वक्तव्यात यावर जोर दिला आहे की, ओरिजनल आधारशिवाय साधारण पेपरवर डाऊनलोड केलेले आधार आणि एमआधार पूर्णपणे वॅलिड आहे. यासाठी तुम्ही स्मार्ट आधारच्या भानगडीत पडण्याची गरज नाही. तुम्हाला कलर प्रिंटची पण गरज नाही. आधार कार्ड लॅमिनेशन किंवा प्लास्टिक आधार कार्डची आवश्यकता नाही. जर तुमचे आधार हरवले असेल तर तुम्ही ते मोफत https://eaadhaar.uidai.gov.in वरून डाऊनलोड करू शकता.