UIDAI ची तब्बल 127 ‘आधार’कार्ड धारकांना नोटीस, उद्यापर्यंत ‘नागरिकत्व’ सिध्द करावं लागणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय विशिष्ठ ओळख प्राधिकरण च्या हैद्राबाद कार्यालयाने चुकीच्या पद्धतीने आधार क्रमांक मिळवल्यामुळे १२७ जणांना नोटीस पाठवली आहे. त्याप्रमाणे त्यांना उद्या आपले नागरिकत्व सिद्ध करावे लागणार आहे. हैद्राबादच्या प्रादेशिक कार्यलयात एक तक्रार आली आहे. त्यामुळे त्यांना नागरिकत्व सिद्ध करावे लागणार आहे. ज्या लोकांना नोटीस दिली गेली आहे ते सर्व मुस्लिम समुदायाचे आहेत. त्यांनी खोटी कागदपत्रे दाखवून चुकीचा आधार क्रमांक मिळवला आहे.

२० फेब्रुवारीला सादर होण्याचे आदेश
हैद्राबाद पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास बरेच वर्षे सुरु होता. या प्रकरणात ज्यांना नोटीस दिली गेली आहे, त्या १२७ जणांना २० फेब्रुवारीला चौकशी अधिकारी अमिता बिंदरु यांच्यासमोर आपले नागरिकत्व सिद्ध करावे लागणार आहे. नोटिशीमध्ये कोणती कागदपत्र सादर करावी लागतील त्याचे डिटेल्स दिलेले आहेत, जर त्यांना आपले नागरिकत्व सिद्ध करता आले नाही तर, त्या १२७ जणांचे आधार कार्ड अवैध ठरविण्यात येणार आहे.

रिक्षाचालकाचं आधार खोटं असल्याची तक्रार
हैद्राबादच्या एका रिक्षाचालकाला युआयडीएआय ने दाखल झालेल्या तक्रारीनंतर नागरिकत्व सिद्ध करण्यास सांगितले आहे. बायोमॅट्रिक्स आधारित प्रणाली चालवणाऱ्या प्राधिकरणाच्या उपसंचालक आणि तपास अधिकाऱ्यांनी रिक्षाचालकाला २० तारखेला सकाळी ११ वाजता त्यांच्यासमोर उपस्थित राहण्यास सांगितले आहे.

काय आहे आधार कायदा ?
२०१६ च्या आधार कायद्यानुसार, आधार हे एखाद्या व्यक्तीचे नागरिकत्व सिद्ध करतो. आधार अधिनियमांतर्गत युआयडीएआय ला आधार द्यायचे की नाही ते ठरवावे लागणार आहे. एखाद्या व्यक्तीचा आधार साठी अर्ज आल्यास ती व्यक्ती किमान १८२ दिवस भारतात वास्तव्यास असली पाहिजे तरच तिला आधार क्रमांक देण्यात येतो.

सुप्रीम कोर्टाने दिले आदेश
सुप्रीम कोर्टाने युआयडीएआयला अवैध प्रवाशांना आधार कार्ड न देण्याचा ऐतिहासिक निर्णय दिला आहे.