gold price today | सोन्याच्या खरेदीसाठी करावं लागणार या नियमांचे पालन, जाणून घ्या दागिन्यांची शुध्दता कशी करायची

नवी दिल्ली : वृत्त संस्था – gold price today | सोने (Gold) खरेदी करताना तुम्ही शुद्ध सोन्याची किंमत चुकवत असाल तर तुम्हाला शुद्ध सोने मिळालेच पाहिजे. परंतु, तुम्ही कसे ठरवू शकता की तुम्ही जे दागिने खरेदी करत आहात ते शुद्ध सोन्याचेच आहेत आणि तुम्ही सरकारच्या ठरलेल्या नियमांचे पालन करत आहात?

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram,
facebook page and Twitter for every update

गोल्ड हॉलमार्किंग (Gold Hallmarking) सरकारने अनिवार्य केले आहे. अशावेळी जर तुम्ही दागिने खरेदी करण्यासाठी जात असाल तर सर्वप्रथम नियम जाणून घेणे खुप महत्वाचे आहे. केंद्र सरकारने सोन्याच्या ज्वेलरीवर बीआयएस हॉलमार्किंग अनिवार्य केले आहे.

Gold Hallmarking काय आहे?
केंद्र सरकारच्या नियमानुसार, गोल्ड हॉलमार्किंग अंतर्गत देशातील सर्व सोने व्यापार्‍यांनी सोन्याचे दागिने किंवा कलाकृती विकताना बीआयएस स्टँडर्डचे मापदंड पूर्ण करावेत, जे याचे पालन करणार नाहीत त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. 14 कॅरेट, 18 कॅरेट आणि 22 कॅरेट शुद्धतेच्या सोन्याचे हॉलमार्किंग केले जाईल.

हॉलमार्किंग दागिने कसे ओळखावे?
ज्वेलर्सला आता प्रत्येक सोन्याच्या वस्तूवर हॉलमार्क आणि सोन्याच्या कॅरेटचा शिक्का उमटवावा लागेल. तो दिसत नसेल तर भिंगाने मोठा करून दाखवण्यास सांगा.

होऊ शकतो कारावास
सरकारच्या या नियमाचे पालन न केल्यास बीआयएस अ‍ॅक्ट, 2016 च्या सेक्शन 29 च्या अंतर्गत एक वर्षाचा कारावास किंवा 1 लाख रुपयांपेक्षा जास्तीचा दंड होऊ शकतो.

घरातील सोन्याचे काय होणार?
Gold Hallmarking चा हा नियम सोन्याचे दागिने विकणार्‍या ज्वेलर्ससाठी लागू आहे. ग्राहक आपली ज्वेलरी विना हॉलमार्कशिवाय विकू शकतात.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram,
facebook page and Twitter for every update

Web Title : uidai indefinitely closed these two special services related to aadhaar card

 

हे देखील वाचा

Pune Police News | 27 वर्षीय तरूणीवर लग्नाच्या आमिषाने बलात्कार, पोलिस कर्मचार्‍याला पोलिस कोठडी

Basmati Rice | ‘किंग ऑफ राईस’ – बासमती चे उत्पादन कमी – ‘फाम’चे वरिष्ठ उपाध्यक्ष राजेश शहा

Modi Cabinet Expansion | केंद्रीय मंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर नारायण राणेंनी मानले ‘या’ 4 जणांचे आभार

UIDAI ने Aadhaar Card संबंधीत 2 विशेष सेवा अनिश्चित काळासाठी केल्या बंद; जाणून घ्या