UIDAI ने Aadhaar Card संबंधीत 2 विशेष सेवा अनिश्चित काळासाठी केल्या बंद; जाणून घ्या
नवी दिल्ली : वृत्त संस्था – भारतीय नागरिकांचे ओळखपत्र आधार कार्ड (Aadhaar Card) प्रत्येक नागरिकासाठी अतियश महत्वाचे आहे. सरकारी आणि प्रायव्हेट क्षेत्रात ते आवश्यक कागदपत्र आहे. Unique Identification Authority of India (UIDAI) वेळोवेळी आधारबाबत सर्वप्रकारचे अपडेट्स देत असते.
Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram,
facebook page and Twitter for every update
नुकतेच UIDAI ने आधारशी संबंधीत महत्वाची माहिती सांगितली आहे ज्या अंतर्गत त्यांनी आधारशी संबंधीत दोन सेवा अनिश्चित काळासाठी बंद केल्या आहेत. होय UIDAI द्वारे जारी करण्यात आलेला हा आदेश देशातील प्रत्येक आधार कार्ड धारकाला प्रभावित करेल. या आदेशांतर्गत आधार कार्डमध्ये पत्ता अपडेट करण्याची सुविधा पुढील आदेशापर्यंत बंद करण्यात आली आहे. यामुळे लोकांची मोठी गैरसोय होणार आहे.
यापूर्वी याआधाराने भाडेकरू किंवा चुकीचा पत्ता नोंदला गेला असेल तर त्यामध्ये सुधारणा करता येत होती. परंतु UIDAI च्या या आदेशानंतर तुम्ही तुमचा पत्ता अनिश्चित काळासाठी बदलू शकणार नाही. या दरम्यान युआयडीएआयने आपल्या वेबसाइटवरील अॅड्रेस व्हॅलिडेशन लेटरशी संबंधीत पर्याय हटवला आहे.
युआयडीएआयद्वारे आधार कार्ड धारकांसाठी आणखी एक सेवा बंद करण्यात आली आहे.
ती सेवा आहे आधार कार्ड रिप्रिंट करणे. होय, यानिर्णयानंतर आता जुन्या मोठ्या कार्डच्या ठिकाणी युआयडीएआयने प्लास्टिकचे पीव्हीसी कार्ड लाँच केले आहे.
हे कार्ड आकाराने छोटे आहे यासाठी ते सोबत ठेवणे सोपे होईल.
Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram,
facebook page and Twitter for every update
Web Title : uidai indefinitely closed these two special services related to aadhaar card
हे देखील वाचा
Pune Police News | 27 वर्षीय तरूणीवर लग्नाच्या आमिषाने बलात्कार, पोलिस कर्मचार्याला पोलिस कोठडी
Basmati Rice | ‘किंग ऑफ राईस’ – बासमती चे उत्पादन कमी – ‘फाम’चे वरिष्ठ उपाध्यक्ष राजेश शहा