‘आधार’कार्डची सुरक्षा वाढवण्यासाठी UIDAI ने केला सर्वात मोठा बदल, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – तुमच्या आधारसंबंधित माहिती डाऊनलोड करण्याची सवलत आणि सुरक्षा वाढवण्यासाठी सरकारने नवे एमआधार अ‍ॅप लॉन्च केले आहे. यासंदर्भात यूआयडीएआयने ट्वीटद्वारे माहिती दिली आहे. आपण आपल्या नोंदणीकृत मोबाइल नंबरच्या मदतीने यूआयडीएआयचे हे अ‍ॅप सहज डाउनलोड करू शकता. हा अ‍ॅप आयओएस आणि अँड्रॉइड प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. या अ‍ॅपमध्ये आधार कार्डधारकाचे नोंदणीकृत नाव, जन्म तारीख, लिंग, पत्ता आणि छायाचित्र संबंधित डेटा उपलब्ध असेल.

असे करा अ‍ॅप डाउनलोड
UIDAI ने दिलेल्या माहितीनुसार, आधी डाउनलोड केलेले एमआधार अ‍ॅप अन-इन्स्टॉल करा. त्याऐवजी नवीन आधार अ‍ॅप डाउनलोड करा. या ट्विटमध्ये अँड्रॉइड व iOS प्लॅटफॉर्मवरून अ‍ॅप डाऊनलोड करण्यासाठी लिंक देण्यात आली आहे.

नवीन अ‍ॅपची खासियत
आधार सेवांसाठी दोन प्रकारचे विभाग असतील. पहिल्या विभागाचे नाव आहे आधार सर्व्हिसेस डॅशबोर्ड. या विभागात सर्व आधार कार्ड धारकारकांसाठी ऑनलाइन आधार सेवा एका सिंगल विंडोमध्ये उपलब्ध करून दिल्या जात्यात.

त्याचबरोबर दुसर्‍या विभागाला my aadhar section असे नाव देण्यात आले आहे. या विभागात, आपण ज्या आधार प्रोफाइलला अ‍ॅड कराल तिला आपण आपल्या आवश्यकतेनुसार आणि सोयीनुसार त्यास पर्सनलाइज करू शकता.

नवे एमआधार अ‍ॅपचे फायदे जाणून घ्या

1) या UIDAI अ‍ॅपची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला आधार कार्ड सोबत ठेवण्याची आवश्यक नाही. सर्व आधार आधारित सेवांसाठी आपण एम आधारची मदत घेऊ शकता. या अ‍ॅपद्वारे आपण बायोमेट्रिकला लॉक किंवा अनलॉक करू शकता.

2) बऱ्याच वेळेस आधारसाठी ओटीपी तुमच्या मोबाईल नंबरवर येत नाही, अशा परिस्थितीत तुम्ही अ‍ॅपचा ओटीपी वापरू शकता. तो केवळ 30 सेकंदांसाठी वैध असतो.

3) या अ‍ॅपद्वारे तुमची कोणतीही माहिती लीक होत नाही कारण आपण आपल्या अ‍ॅपच्या मदतीने क्यूआर कोडद्वारे माहिती शेयर करू शकता.

Visit : Policenama.com