कामाची गोष्ट ! आता घर बसल्या करा ‘आधार’कार्ड संबंधित सर्व महत्वाची कामं, UIDAI नं लॉन्च केलं मोबाईल App

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आधार कार्ड हा महत्त्वाचा दस्तऐवज आहे. त्यामुळे आधार कार्ड अपडेट ठेवणं खूप गरजेचं आहे. यासाठी युनिक आयडेंटीफिकेशन ऑथोरिटी ऑफ इंडियानं (UIDAI) यासाठी नवीन मोबाईल अ‍ॅप लाँच केलं आहे.

UIDAIनं लाँच केलं मोबाईल अ‍ॅप
 आधार कार्ड अपडेट करताना तुम्हाला अनेकदा अडचणी येऊ शकतात. त्यामुळे आता mAadhaar मुळे सामान्य जनतेला सर्वकाही सोपं होणार आहे. या अ‍ॅपमध्ये आधार कार्डशी संबंधित अनेक सेवा दिल्या जातील. यात बायोमॅट्रीक लॉक अनलॉकचा ऑप्शनही असणार आहे. हे अ‍ॅप अँड्रॉईड तसेच आयओएससाठीही उपलब्ध असेल.

या अ‍ॅपमध्ये मिळतील पुढील सुविधा
– आधार कार्ड डाऊनलोड करणं
– स्टेटस चेक करणं
– आधारच्या रिप्रिंटसाठी ऑर्डर देणं
– आधार सेवा केंद्राचा पत्ता मिळवणं
– ऑफलाईन केवायसी डाऊनलोड करणं
-क्युआर कोड स्कॅनिंग

याशिवाय या अ‍ॅपमध्ये माय आधार कॅटेगरी असणार आहे. यात तुम्हाला आधार प्रोफाईलसाठी सेक्शन मिळणार आहे. हे पूर्णपणे पर्सनल असणार आहे. याचा दुसरा सेक्शन मेन सर्व्हिस डॅशबोर्ड आहे.

घरबसल्या करू शकता अनेक कामे
आधार कार्डमध्ये माहिती अपडेट करण्यासाठी बुधवारी अधिसूचना जारी करण्यात आली. यात म्हटलं आहे की, आता आधारवरील पत्ता सहज बदलला जाऊ शकतो. जे लोक केवायसीसाठी आधार नंबर देत आहेत आणि त्यांना पत्ता दुसरा द्यायचा आहे जो आधारवरील पत्त्यापेक्षा वेगळा आहे तर एक सेल्फ डिक्लेरेशन देत ते लोक दुसरा पत्ता देऊ शकता.
Visit : Policenama.com