Aadhaar Card च्या ‘या’ अ‍ॅपमध्ये UIDAI ने केले बदल, आता 5 लोकांची प्रोफाइल करू शकता ‘समाविष्ट’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सरकारने डिजिटल इंडियाला प्रोत्साहन देण्यासाठी 2017 मध्ये mAadhaar अ‍ॅप लाँच केले होते. हे अ‍ॅप डाऊनलोड केल्यानंतर यूजर्सला पेपर फॉर्मेटमध्ये ’आधार कार्ड’ कॅरी करण्याची आवश्यकता नाही. हे अ‍ॅप आधार नियामक युआयडीएआयने (युनीक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया) बनवले आहे. युआयडीएआयने या अ‍ॅपमध्ये एक नवीन बदल केला आहे. या बदलानुसार आता एमआधारमध्ये 5 लोकांचे आधार कार्ड प्रोफाइल अ‍ॅड केले जाऊ शकते.

युआयडीएआयने ट्विटद्वारे ही माहिती दिली आहे. यामध्ये अगोदर एमआधार अ‍ॅपवर कमाल तीन प्रोफाइल अ‍ॅड केल्या जाऊ शकत होत्या. अ‍ॅपमध्ये यूजर्स नेम, डेट ऑफ बर्थ, जेंडर आणि अ‍ॅड्रेससोबत फोटोग्राफ आणि आधार नंबर लिंक आहे.

गुगल प्ले स्टोरमधून डाऊनलोड करा अ‍ॅप
हे एमआधार अ‍ॅप गुगल प्ले स्टोरमधून डाऊनलोड करू शकता. हे अ‍ॅप यूज करण्यासाठी यूजर्सला रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे. जर नंबर रजिस्टर्ड नसेल तर जवळच्या आधार एनरॉलमेंट सेंटरमध्ये जाऊन रजिस्टर्ड करू शकता.

5 आधार कार्ड प्रोफाइल अ‍ॅड करू शकता
एमआधारमध्ये 5 प्रोफाइल अ‍ॅड करण्यासाठी आवश्यक आहे की, पाच आधारकार्डमध्ये तोच मोबाइल नंबर रजिस्टर्ड असावा, ज्या स्मार्टफोनवर अ‍ॅप इन्स्टॉल केले आहे.

मोबाइलमध्ये कॅरी करा आपले आधार कार्ड
पर्सनल डाटा सुरक्षित राहावा यासाठी अ‍ॅपमध्ये बायोमॅट्रिक लॉकिंग सिस्टम दिली आहे. अ‍ॅपमध्ये टीओटीपी सिस्टम देण्यात आली आहे. याद्वारे ऑटोमॅटिकली टेम्पररी पासवर्ड जनरेट होईल. या अ‍ॅपद्वारे यूजर्स आपली प्रोफाइल सुद्धा अपडेट करू शकतील. या अ‍ॅपनंतर आता यूजर्सला आधार कार्डची हार्ड कॉपी आपल्या सोबत ठेवण्याची आवश्यकता नाही.