‘UIDAI’ चा नवा नियम! कोणत्याही वैध दस्तावेजाशिवाय ‘Aadhaar’ करा ‘अपडेट’, ‘हे’ दस्तावेज असेल ‘वैध’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आधारची सरकारी संस्था UIDAI ने आधार कार्डवरील नाव, पत्ता, जन्म तारीख बदलण्यासंबंधित मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे आता तुमच्याकडे आधार वरील नाव, पत्ता आणि जन्मतारीख बदलण्यासाठी आवश्यक दस्तावेज नसतील तरी देखील तुम्ही ही आवश्यक माहिती अपडेट करु शकतात. या प्रक्रियेला आधिक सोपं करण्यासाठी UIDAI ने आधारचा एक स्टॅण्डर्ड फॉर्मेट तयार केला आहे. ज्याची माहिती ट्विटरद्वारे देण्यात आली आहे. UIDAI ने सांगितले की कोणत्याही वैध दस्तावेजाशिवाय आता या सर्टिफिकेटच्या आधारे तुम्ही आधारमधील तुमची माहिती बदलू शकतात.

UIDAI कडून सांगण्यात आले की आधारमध्ये कोणत्याही बदलासाठी आता तुम्हाला ग्रुप ए आणि ग्रुप बी गॅजेटेड अधिकारी/ गाव प्रमुख/ आमदार / खासदार / तहसीलदार / शिक्षण अधिकारी / वार्डन यांच्याकडून UIDAI ने जारी केलेल्या एक स्टॅण्डर्ड सर्टिफिकेटवर आपली माहिती भरुन स्वाक्षरी घ्यावी लागेल.

आधार एनरोलमेंट –
आधार एनरोलमेंटमध्ये कोणतेही शुल्क घेतले जात नाही. परंतु तुम्ही पहिल्यांदा आधार कार्ड एनरोल करत असाल तर तुम्हाला शुल्क द्यावे लागणार नाही. ते पूर्णपणे मोफत असेल.

अशी बुक करा ऑनलाइन अप्वाइंटमेंट –
– UIDAI च्या वेबसाइटवर जाऊन तुमचे शहर निवडून अप्वॉइंटमेंट बुक करा, त्यासाठी तुम्हाला तुमचे शहर निवडावे लागेल. सध्या ही सुविधा काही शहरात 114 सेंटर्समध्ये उपलब्ध आहे, आता 53 शहरात लवकरत सुरु ही सुविधा सुरु करण्यात येईल.
– तुम्हाला तुमचा मोबाइल नंबर द्यावा लागेल ज्यावर ओटीपी येईल.
– त्यावर तुम्हाला तुमचा मोबाइल नंबर आणि नाव सिलेक्ट करावे लागेल आणि भाषा सिलेक्ट करा.
– दिनांक आणि वेळ निवडावी लागेल त्यानंतर अप्वॉइंटमेंट बुकिंग नंबर मिळेल.

येथे करा तक्रार –
या शुल्काशिवाय तुमच्याकडून एखाद्या व्यक्ती जास्त पैसे अवैधरित्या वसुल करत असेल तर तुम्ही याची तक्रार करु शकतात. यासाठी 1947 या टोल फ्री नंबरवर संपर्क साधा. तसेच तुम्ही [email protected] वर ई-मेल देखील करु शकतात.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/