कामाची गोष्ट ! भाडेकरूंसाठी बदलला Aadhar Card वरील पत्ता बदलण्याच्या संबंधातील ‘हा’ नियम, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्त संस्था – UIDAI ने भाडेकरूंसाठी आधारशी संबंधित नियम सोपा केला आहे. आता कोणत्याही महत्वाच्या कागदपत्रांमध्ये मुळ पत्ता न देता आधारवर आपला पत्ता बदलू शकता. अगदी सोप्या शब्दात सांगायचे तर प्रतिज्ञापत्राद्वारे सहजपणे पत्ता बदलता येणार आहे. यूनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) आपल्याकडून प्रतिज्ञापत्र घेऊन आधारवरील पत्ता बदलून देणार आहे. मागील काही दिवसांपासून ही मागणी केली जात होती की, सरकारने प्रतिज्ञापत्राद्वारे पत्ता बदलने आणि बँक खाते उघडण्यासाठी परवानगी द्यावी. यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. स्थलांतर करणाऱ्या कार्डधारकांना याचा फायदा होणार आहे.

भाडेकराराची नोंद अशी करा
जर तुमचे अधार कार्ड तुमच्या मोबाईल क्रमांकाशी लिंक आहे तर तुम्ही UIDAIचे अधिकृत संकेतस्थळ uidai.gov.in वरून तुमचा पत्ता ऑनलाईन अपडेट करू शकता. जर तुमचे आधार मोबाईल क्रमांकाशी लिंक नसेल तर तुम्ही आधार केंद्रात जाऊन पत्ता बदलू शकता.

आधार कार्डावरील पत्ता आपल्या भाडेकराराद्वारे बदलण्यासाठी तुम्हाला तुमचा भाडेकरार प्रथम स्कॅन करावा लागेल. यानंतर त्याची पीडीएफ तयार करून आधार अपडेट संकेतस्थळावर अपडेट करावे लागेल.

असे करा Aadhaar Card Address Update

स्टेप-१ प्रथम UIDAI च्या अधिकृत संकेतस्थळ https://uidai.gov.in/ वर जा.

स्टेप-२ यानंतर होमपेजवरील अड्रेस अपडेट रिक्वेस्ट (ऑनलाइन) वर क्लिक करा.

स्टेप-३ नवीन विंडोमध्ये अपडेट Address वर क्लिक करा.

स्टेप-४ आधार कार्ड नंबर टाकून लॉग-इन करा.

स्टेप-५ यानंतर तुम्हाला मोबाईलवर ओटीपी (वन टाईम पासवर्ड) येईल.

स्टेप-६ ओटीपी टाकल्यानंतर पोर्टलवर जा.

दुसरी पद्धत
UIDAIचे संकेतस्थळ अथवा आधार केंद्रातून करेक्‍शन फॉर्म घ्या. हा फॉर्म संकेतस्थळावरील डाऊनलोड सेक्शनमध्ये मिळेल. यात सर्व आवश्यक माहिती भरून केंद्रातील संबंधित व्यक्तीला द्या.

याबरोबरोच फॉर्मवर तुम्हाला जी माहिती अपडेट करायची आहे तिचा उल्लेख करा. तसेच आधार कार्डच्या फोटोकॉपीसह पॅन कार्ड, वोटर कार्ड अथवा पासपोर्टची फोटोकॉपी द्यावी लागेल.

आधार सेंटरवर जाऊन तुमचे नाव, पत्ता, जन्म तारिख, मोबाईल नंबर, ईमेल आयडी, फोटो व बायोमेटिड्ढक डिटेल्‍स बदलू शकता. यासाठी ५० रूपये शुल्क आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/