पदवीधर, डिप्लोमाधारकांसाठी सरकारी नोकरीची ‘सुवर्ण’संधी, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – युनिक आयडेन्टिफिकेशन ऑथॉरटी ऑफ इंडिया (UIDAI) मध्ये पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. कंटेट रायटर पदांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. हा अर्ज भरण्याची अंतिम तारीख 31 ऑक्टोबर 2019 आहे.

महत्वाच्या तारखा –
अर्ज करण्याची अंतिम तारीख – 31 ऑक्टोबर 2019

शैक्षणिक पात्रता –
इच्छुक उमेदवारींनी किमान पत्रकारिता आणि जनसंचारची पदवी घेतली असावी किंवा डिप्लोमा असावा. याशिवाय उमदेवारांकडे मास कम्युनिकेशन किंवा मार्केटिगंमध्ये पदवी किंवा पदव्युत्तर पदवी असावा.

कामचा अनुभव –
अर्जदाराला कामाचा अनुभव किमान 2 ते 4 वर्ष असावा.

नोकरीचे ठिकाण –
निवड झालेल्या कर्मचाऱ्यांना दिल्लीत आपला कार्यभार स्विकारावा लागेल.

काय आहे जॉब प्रोफाइल –
1.
अर्जदाराला सध्याच्या ब्रांडिंग दिशानिर्देशांचे पालन करावे लागेल.
2. सोशल मिडिया पोस्टसाठी वेगाने, आकर्षक आणि प्रामाणिक कॉपी लिहिता आली पाहिजे.
3. जाहिरातीसाठी क्रिएटीविटी हवी.
4. लेख माहितीपूर्ण आणि शोधपूर्ण असावा.
5. निवडक उमेदवारांना पेज लेआऊट आणि ग्राफिक्स तयार करण्याची क्रिएटिविटी पाहजे जेणेकरुन डिझायनर बरोबर काम करता येईल.

उमेदवार या पदांसाठी https://uidai.gov.in/ या वेबसाइटला भेट देऊन आपला अर्ज भरु शकतात.

Visit  :Policenama.com

You might also like