‘या’ पध्दतीनं बनवा नवजात बाळाचे आधार, जाणून घ्या कोणत्या कागदपत्रांची आहे आवश्यकता

नवी दिल्ली : युआयडीएआयने देशात जन्मणार्‍या नवजात बाळांसाठी सुद्धा आधारची सुविधा दिली आहे. म्हणजे आता नवजात बाळाचे सुद्धा आधार बनवू शकता. देशातील काही हॉस्पीटलसुद्धा आपल्या इथे जन्माला येणार्‍या बाळांचे आधार कार्ड बनवण्यासाठी प्रोसेस पूर्ण करतात. सध्या मुलांपासून मोठ्यापर्यंत सर्वांसाठी आधार कार्ड एक महत्वाचे कागदपत्र आहे. त्याच्याशिवाय अनेक कामे अडकून पडतात. युआयडीएआयने ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे.

युआयडीएआयने केले ट्विट
युआयडीएआयने ट्विटमध्ये लिहिले आहे की, प्रत्येकाने आधारसाठी एन्रॉल करावे, इतकेच काय नवजात बाळासाठी सुद्धा नोंदणी केली जाऊ शकते. यासाठी तुमच्याकडे बाळाच्या जन्माचा दाखला आणि आई-वडीलांपैकी एकाचे आधार आसावे.

घेतले जात नाही बायोमेट्रिक
एक दिवसापासून 5 वर्षापर्यंतच्या मुलांच्या आधारसाठी बायोमेट्रिक डाटा घेतला जात नाही. 5 वर्षापर्यंत मुलांचे बायोमेट्रिक बदलत राहते, यामुळे ते घेतले जात नाही. जेव्हा मुल 5 वर्षांचे होईल तेव्हा बायोमेट्रिक माहिती अपडेट करू शकता.

कोणत्या कागदपत्रांची आहे आवश्यकता
एक दिवसाच्या बाळाचे आधार बनवण्यासाठी मुलाच्या जन्माचा दाखला आणि आई-वडीलांपैकी एकाचे आधार कार्ड लागते. या दोन कागदपत्रांच्या मदतीने बाळाचे आधार कार्ड सहज बनवता येते.

केस कराल रजिस्ट्रेशन –

* युआयडीएआयच्या वेबसाईटवर जा आणि आधार कार्ड रजिस्ट्रेशनच्या लिंकवर क्लिक करा.

* तिथे फॉर्म डाऊनलोड करा आणि त्यामध्ये मुलाचे नाव, आपले नाव, आपला मोबाईल नंबर, ईमेल इत्यादी भरा.

* यानंतर तुम्हाला आधार कार्ड सेंटरसाठी अपॉईमेंट मिळेल.

* आता तुम्हाला ठरलेल्या दिवशी आणि वेळी आधार एन्रॉलमेंट सेंटरवर सर्व आवश्यक डॉक्युमेंट घेऊन जावे लागेल.

या लिंकवर करा व्हिजिट
मुलांच्या आधारबाबत अधिक माहिती आणि अपॉईमेंटसाठी तुम्ही https://ask.uidai.gov.in/ या लिंकवर व्हिजिट करू शकता.