Aadhaar Card : आता घरबसल्या अपडेट करा नाव, पत्ता आणि DoB, UIDAI नं पुन्हा सुरू केली सुविधा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जर तुम्हाला सुद्धा आधारमध्ये काही माहिती अपडेट करायची आहे तर तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे. आधार जारी करणारी संस्था युआयडीएआयने ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. आता तुम्ही पुन्हा एकदा घरबसल्या आपले नाव, पता, जन्म तारीख आणि लिंग अपडेट करू शकता. मध्यंतरी युआयडीएआयने अ‍ॅड्रेसच्या शिवाय सर्व डेमोग्राफिक डिटेल्स अपडेट करण्याची सुविधा बंद केली होती, परंतु पुन्हा एकदा ही सुविधा सुरू करण्यात आला आहे.

युआयडीएआयने केले ट्विट
युआयडीएआयने ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. ट्विटमध्ये लिहिले आहे की, तुम्ही आता घरबसल्या युआयडीएआयच्या वेबसाइटवर आपले नाव, पत्ता, जन्म तारीख आणि लिंग अपडेट करू शकता. या लिंकवर https://ssup.uidai.gov.in/ssup/ क्लिक करा आणि घरबसल्या आधार अपडेट करा.

घरबसल्या असे करा अपडेट –
* यासाठी तुम्हाला सर्वप्रथम ऑफिशियल बेवसाइटवर जावे लागेल.
* येथे तुम्हाला ‘माय आधार’ सेक्शनमध्ये जाऊन ‘अपडेट युअर आधार’ वर जावे लागेल.
* यानंतर ‘अपडेट डेमोग्राफिक्स डेटा ऑनलाइन’ वर क्लिक करावे लागेल.
* यानंतर एक नवीन पेज उघडेल.
* याशिवाय तुम्ही डायरेक्ट https://ssup.uidai.gov.in/ssup/ वर सुद्धा व्हिजिट करू शकता.
* आता येथे तुम्हाला ‘प्रोसीड टू अपडेट आधार’ वर क्लिक करावे लागेल.
* नवीन उघडलेल्या पेजवर 12 डिजिटचा आधार नंबर एंटर करा.
* कॅप्चा कोड टाकून सेंड ओटीपीवर क्लिक करा.
* रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर आलेला ओटीपी योग्य स्पेसमध्ये टाकून सबमिट करा.
* आता नवीन उघडलेल्या पेजवर तुम्हाला दोन पर्याय मिळतील –
1. सपोर्टिंग डॉक्युमेंट प्रूफसह अ‍ॅड्रेससह डेमोग्राफिक डिटेल्सचे अपडेशन
2. अ‍ॅड्रेस व्हॅलिडेशन लेटरद्वारे अ‍ॅड्रेस अपडेट, नाव, जन्म तारीख, लिंग, पत्त्यात डॉक्युमेंट * प्रूफसह अपडेट करण्यासाठी ‘अपडेट डेमोग्राफिक्स डेटा’ वर क्लिक करावे लागेल.
* यानंतर तुम्हाला ज्या डिटेलला अपडेट करायचे आहे, ते निवडावे लागेल. यानंतर पुढील प्रक्रिया पूर्ण होईल.

मोबाइल नंबर असावा लागेल रजिस्टर्ड
ऑनलाइन अपडेशनच्यावेळी तुम्हाला या गोष्टीची काळजी घ्यावी लागेल की, तुमच्याकडे तुमचा रजिस्टर्ड मोबाइल नंबर असावा, कारण तुम्ही सर्व ओटीपी त्याच नंबरवर येतील.