खुशखबर ! UIDAI ने ‘आधार’ बनवण्यासाठी व्हेरिफिकेशन फी केली फक्त 3 रुपये

नवी दिल्ली : UIDAI | भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (UIDAI) ग्राहकांसाठी आधार पडताळणी (verification) शुल्क 20 रुपयांवरून कमी करून 3 रुपये केले आहे. केंद्रांनी विविध सेवा आणि लाभांद्वारे लोकांचे जीवन सुसह्य करण्यासाठी त्यांच्या संरचनात्मक सुविधांचा लाभ घ्यावा, हा या मागील उद्देश आहे.

एनपीसीआय-आयएएमएआयद्वारे आयोजित जागतिक फिनटेक फेस्टला संबोधित करताना UIDAI चे सीईओ सौरभ गर्ग (uidai ceo saurabh garg) यांनी म्हटले की, आर्थिक तंत्रज्ञान क्षेत्रात आधारचा लाभ घेतला जाण्याची मोठी शक्यता आहे.

डिजिटल मुलभूत संरचनेचा चांगला उपयोग व्हावा

त्यांनी म्हटले की, आम्ही प्रति पडताळणीचा दर 20 रुपयांवरून कमी करून 3 रुपये केला आहे. याचा उद्देश हा आहे की, विविध एजन्सीज आणि संस्थांनी सरकारद्वारे तयार डिजिटल मुलभूत संरचनेचा चांगला वापर करावा. सन्मानासह लोकांचे जीवन सुसह्य करण्यासाठी या मुलभूत संरचनेचा वापर आवश्यक आहे. आतापर्यंत 99 कोटी ई-केवायसी (आपल्या ग्राहकाला ओळखा)साठी आधार प्रणालीचा वापर करण्यात आला आहे.

आधार कार्ड खरे आहे की बनावट

UIDAI ने आपल्या ग्राहकांसाठी विशेष अलर्ट (Aadhaar Card Alert) जारी केला आहे. यामध्ये म्हटले आहे की, सर्व 12 डिजिट नंबर आधार कार्ड (Aadhaar Card) खरे नाहीत.
सध्या आधार कार्ड प्रत्येक कामासाठी आवश्यक कागदपत्र आहे.
यामुळे आधारमध्ये बनावटगिरी आणि छेडछाड सुद्धा वाढली आहे.
याच फसवणुकीपासून वाचण्यासाठी युआयडीएआयने इशारा दिला आहे.
कार्डधारकाची ओळख पटवण्यासाठी आधारकार्ड स्वीकरण्यापूर्वी व्हेरिफाय करणे आवश्यक आहे.

UIDAI ने आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, फसवणूक करणार्‍यांपासून सावध रहा.
कोणतेही आधार ऑनलाइन किंवा ऑफलाइन पडताळणीस पात्र आहे.
ऑफलाइन पडताळणीसाठी, ई-आधार किंवा आधार पत्र किंवा आधार पीव्हीसीकार्डवरील क्यूआर कोड स्कॅन करा.

ऑनलाइन पडताळणीसाठी, https://resident.uidai.gov.in/verify लिंकवर जाऊन 12 अंकी आधार नंबर नोंदवा, तुम्ही यासाठी Aadhaar अ‍ॅपचा वापर सुद्धा करू शकता.

काय आहे पूर्ण प्रोसेस

ऑनलाइन आधार व्हेरिफाय करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम https://resident.uidai.gov.in/verify वर जावे लागेल. तिथे 12 अंकाचा आधार नंबर नोंदवा. नंतर कॅप्चा व्हेरिफिकेशन पर्यायावर जाऊन तिथे दिलेला कॅप्चा कोड भरून प्रोसीड टू व्हेरिफायच्या ऑपशनवर क्लिक करा. इतके केल्यानंतर आधार व्हेरिफाय होईल.

हे देखील वाचा

Bank Holidays In October | ऑक्टोबरमध्ये 21 दिवस बंद राहतील बँका, जाणून घ्या कोणत्या राज्यात केव्हा-केव्हा बंद आहेत बँका, येथे पहा पूर्ण List

Police Raid | खंडणी वसुलीसाठी पोलिसांची छापेमारी ! 3 तरुणांना बेदम मारहाण एकाचा मृत्यू; 6 पोलीस निलंबित

BJP-MNS Alliance | ‘या’ 4 निवडणुकांमध्ये भाजप-मनसे युती होणार? शिवसेनेची चिंता वाढली?

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :UIDAI | uidai reduced the verification fee for aadhaar generation from rs 20 to rs 3

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update