भाडेकरूंसह आता कुणीही घरबसल्या अपडेट करू शकतं कुटुंबाच्या सदस्यांचा Aadhaar Card मधील पत्ता, जाणून घ्या प्रक्रिया

नवी दिल्ली : वृत्त संस्था – आधार कार्ड जारी करणारी संस्था युनिक आयडेंटिफिकेशन अ‍ॅथोरिटी ऑफ इंडिया (युआयडीएआय) ने घरचा पत्ता बदलणार्‍यांसाठी नवी सुविधा आणली आहे. याद्वारे तुम्ही अगदी सहज आपला आणि आपल्या कुटुंबातील सदस्यांच्या आधार कार्डातील पत्ता बदलू शकता. युआयडीएआयने ट्विट करून सांगितले आहे की, तुम्ही अ‍ॅड्रेस व्हॅलिडेशन लेटर चा वापर करून सहजपणे आधार कार्डातील पत्ता अपडेट करू शकता. यासोबतच कुटुंबातील अन्य सदस्यांच्या आधारमध्येही घर बसल्या अपडेट करू शकता.

 

असा बदलू शकता अ‍ॅड्रेस

* जर तुमच्याजवळ नव्या पत्त्याचा काहीही पुरावा नाही, तरी सुद्धा तुम्ही आधारमध्ये पत्ता बदलू शकता. यासाठी तुम्हाला युआयडीएआयच्या वेबसाइटवर जाऊन अ‍ॅड्रेस व्हॅलिडेशन लेटर मिळण्यासाठी अर्ज करावा लागेल.

* वरील प्रकिया पूर्ण केल्यानंतर तुमच्या पत्त्यावर एक पत्र पाठवण्यात येईल, ज्यामध्ये सीक्रेट कोड असेल. नंतर तुम्ही या कोडच्या मदतीने आधारमधील पत्ता बदलू शकता.

* अ‍ॅड्रेस व्हॅलिडेशन पत्राद्वारे तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्य, मित्र, नातेवाईक, घर मालक किंवा अन्य व्यक्तीचा पत्ता अपडेट करू शकता.

अशी आहे पूर्ण प्रक्रिया

1. आधार कार्डमध्ये कागदपत्राशिवाय पत्ता बदलण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम युआयडीएआयच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.

2. युआयडीएआयच्या वेबसाईटवर तुम्हाला अपडेट अ‍ॅड्रेसवर क्लिक करावे लागेल.

3. आता तुम्हाला 12 डिजिट वाला आधार नंबर टाकावा लागेल.

4 टेक्स्ट व्हेरिफिकेशन कोडसाठी सेंड ओटीपीवर क्लिक करा. आता आलेला ओटीपी टाका.

5 यांनतर तुम्हाला अ‍ॅड्रेस ऑपशनवर क्लिक करावे लागेल. आता तुमचा करंट अ‍ॅड्रेस टाका आणि तो सबमिट करा.

6 याशिवाय काही बदल करायचे असतील तर तुम्ही मॉडिफाय ऑपशनवरवर क्लिक करू शकता. यानंतर डिक्लेरेशनवर क्लिक करून पुढे जा.

7 ही प्रोसेस केल्यानंतर काही कालावधीनंतर तुम्ही दिलेल्या नव्या पत्त्यावर अ‍ॅड्रेस व्हॅलिडेशन लेटर येईल, त्यातील कोडचा वापर करून अ‍ॅड्रेस अपडेट होईल.