कामाची गोष्ट ! आता घरबसल्या SMS व्दारे होतील ‘आधार’कार्ड संबंधित ही कामे, UIDAI नं सुरू केली नवी ‘सर्व्हिस’, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आधार कार्ड बनविणारी सरकारी संस्था, युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) ने ‘आधार सर्व्हिसेस ऑन एसएमएसवर’ ही नवीन सेवा सुरू केली आहे. ही सेवा त्या आधार क्रमांक धारकांसाठी सुरू केली गेली आहे. जे इंटरनेट, रेजिडेंट पोर्टल आणि एम-आधार ऍक्सेस याचा वापर करत नाहीत. आधार कार्ड वापरणारे व्हर्च्युअल आयडी जनरेशन, आधार लॉक / अनलॉक, बायोमेट्रिक लॉक / अनलॉक इत्यादी आधार सेवा एसएमएसद्वारे घेऊ शकतात.

काय आहे  आधार एसएमएस सेवा ?

आपण ही सेवा केवळ एसएमएसद्वारे वापरू शकता. यासाठी आपल्याकडे कोणताही सामान्य फोन असणे गरजेचे आहे. एसएमएसवरून व्हर्च्युअल आयडी जनरेट करता येतो. आपल्या नोंदणीकृत क्रमांकावरून 1947 वर एसएमएस करा. याद्वारे आपण  व्हर्च्युअल आइडेंटिटी (VID)  जनरेट करू शकता सोबतच रिट्राइव  करू शकता. आपण एसएमएस पाठवून आपला आधार नंबर लॉक किंवा अनलॉक करू शकता. आधार  ऑथेंटिकेशन आणि बायोमेट्रिक लॉक किंवा अनलॉकसाठी आपल्याला ओटीपी (वन टाइम संकेतशब्द) आवश्यक आहे. दरम्यान, व्हीआयडी जनरेशन किंवा रिट्राइवल याची आवश्यकता नाही.

आधार नंबर लॉक किंवा अनलॉक कसा करावा?

आधार नंबर लॉक करण्यासाठी आपल्या आधार क्रमांकाचे 4 किंवा 8 अंक GETOTP <स्पेस> वर 1947 वर पाठवा. यानंतर आपल्याला 6 अंकी ओटीपी मिळेल. त्यानंतर  LOCKUID   <स्पेस> नंतर, आपल्या आधार क्रमांकाचे 4 किंवा 8 क्रमांक लिहा, नंतर स्पेस  देऊन  ओटीपी पाठवा. यानंतर तुमचा आधार नंबर लॉक होईल. यानंतर तुम्हाला एक कन्फर्मेशन कॉल येईल. आधार नंबर लॉक झाल्यानंतर आपण बायोमेट्रिक किंवा ओटीपीद्वारे आधार नंबर वापरू शकणार नाही.

दरम्यान, यानंतर देखील, आपण  ऑथेंटिकेशनसाठी  व्हीआयडीचा वापर करू शकता. आधार नंबर अनलॉक करण्यासाठी, आपल्याला नवीन व्हीआयडीची आवश्यकता असेल. यासाठी, आपल्याला 1947 वर आशा स्वरूपात एसएमएस करणे आवश्यक आहे. GETOTP <स्पेस> VID चे 6 किंवा 10 अंक 1947 वर पाठवा. एकदा आपल्याला ओटीपी मिळाल्यानंतर आपण आपला आधार नंबर अनलॉक करू शकता. अनलॉक करण्यासाठी आपल्याला 1947 रोजी  UNLOCKUID  < स्पेस> व्हीआयडीचे 6 किंवा 8 अंक <स्पेस> ओटीपीवर पाठवावे लागतील. यासह आपला आधार नंबर अनलॉक होईल.