Ujani Dam | पुणे, सोलापूरकरांचा घसा कोरडा; उजनी धरण परिसरातील नागरिकांना मान्सूनची प्रतीक्षा

इंदापूर: Ujani Dam | सध्या राज्यात कमी पावसामुळे दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. जनावरांना तसेच काही भागात लोकांना पिण्याच्या पाण्याचीही टंचाई जाणवू लागली आहे. हंडाभर पाण्यासाठी वणवण फिरण्याची वेळ आली आहे.

नागरिकांकडून जनावरांसाठी चारा छावण्या सुरु करण्याची मागणी होत आहे. मिळालेल्या आकडेवारीनुसार, मराठवाड्यात महत्वाची ४० धरणे आहेत मात्र यात फक्त १६ टक्के पाणीसाठा आहे. संभाजीनगरला ८१ लघुप्रकल्प आहेत त्याठिकाणी फक्त सहा टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.(Ujani Dam)

पुण्यात ५० प्रकल्प आहेत यात फक्त २४ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे तर जायकवाडी धरणात ५. टक्के जलसाठा शिल्लक आहे. देशभरातील सर्वाधिक धरणे महाराष्ट्रात आहेत मात्र पाण्याचा विचार केला तर गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.

उजनी धरणाने पुणे, सोलापूरकरांचा घसा कोरडा केला आहे. उजनी धरणातील पाण्यावर आसपासचा मोठा भाग अवलंबून आहे. मात्र धरणात पाणीच नसल्याने आसपासच्या शेतकऱ्यांवर मोठे संकट उभे राहिले आहे. उजनी धरणाची क्षमता १०० टक्के भरल्यावर ११२ टीएमसी एवढी असून प्रशासनाने धरणात १११ टक्के म्हणजे १२३ टीएमसी पाणी साठवण्याची व्यवस्था केलेली आहे.

अशा स्थितीत १९८० साली पाणी भरण्यास सुरुवात झालेल्या या उजनी धरणाने ४४ वर्षातील सर्वात निच्चांकी पातळी ओलांडली आहे. यापूर्वी ३० जून २०१९ साली जेंव्हा धरण ९६ टक्के भरले होते तेंव्हा वजा ५९ टक्के ही निच्चांकी पातळी गाठली होती. यंदा धरणात केवळ ६० टक्के पाणी असताना एक महिना आधीच त्या निच्चांकी पातळीवर धरणाचा पाणीसाठा पोहोचला आहे.

धरणाने निच्चांकी पातळी गाठल्याने अनेकांच्या तोंडचं पाणी पळालं आहे.
त्यामुळे, आता सर्वांच्या नजरा पुढील काही दिवसांत येणाऱ्या मान्सूनकडे लागल्या आहेत.

दिलासादायक गोष्ट म्हणजे यंदा हवामान विभागाने १०६ टक्के पाऊस असल्याचे सांगत वेळेवर मान्सून सुरु होईल असा
अंदाज व्यक्त केला आहे. म्हणून, पावसाला लवकर सुरुवात होण्याची अपेक्षा प्रशासनासह नागरिकांनाही आहे.

मात्र मान्सून वेळेवर दाखल झाला नाही तर दुष्काळाची दाहकता अजून वाढणार आहे.
त्यामुळे या भागातील सर्वांचे डोळे आभाळाकडे लागले आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Dr Ajay Taware-Dr. Shrihari Halnor | डॉ. अजय तावरे व सहकार्‍यांवर ‘मोका’अंतर्गत कारवाई करून शासकीय सेवेतून निलंबित करा

Swapping Blood Sample-Sassoon Hospital | ससूनमधला ‘तो’ कर्मचारी गायब; पुणे पोलीस सीसीटीव्ही फुटेज तपासणार

Gurmeet Ram Rahim | हत्याप्रकरणात राम रहिमला दिलासा; हायकोर्टाकडून निर्दोष मुक्तता, CBI कोर्टाचा निर्णय रद्द

Talegaon Dabhade Pimpri Crime News | पिंपरी : आठवडे बाजारात सोनसाखळी चोरणाऱ्या चोरट्याला अटक

Porsche Car Accident Pune | पोर्शे टीमने डेटा मिळवला; बिल्डर मुलाची कुंडली मिळणार…

Swapping Blood Sample-Sassoon Hospital | अपघातातील आरोपी मुलासाठी रक्त देणाराही पोलिसांच्या ‘रडार’वर